Home Breaking News 🛑 नवीन टीव्ही घेताय ; केंद्राच्या या निर्णयाने तुम्हाला मोजावे लागतील जादा...

🛑 नवीन टीव्ही घेताय ; केंद्राच्या या निर्णयाने तुम्हाला मोजावे लागतील जादा पैसे 🛑

115
0

🛑 नवीन टीव्ही घेताय ; केंद्राच्या या निर्णयाने तुम्हाला मोजावे लागतील जादा पैसे 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 22 सप्टेंबर : ⭕ आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक उत्पादनांना बाजारात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून मागील काही महिने धडाकेबाज निर्णय घेतले जात आहेत. विशेष म्हणजे चिनी मालाची आयात कमी करणारे निर्णय सरकारकडून घेतले जात आहे. असाच एक निर्णय सरकारने घेतला आहे मात्र यामुळे टेलिव्हिजनच्या किमतीत किमान २५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने येत्या ऑक्टोबरपासून टीव्ही संचात लागणाऱ्या ओपन सेलवरील आयात शुल्कात ५ टक्के वाढ करण्याचे जाहीर केले आहे. १ ऑक्टोबरपासून ही शुल्कवाढ लागू होणार आहे. यामुळे टीव्हीच्या किमतीत किमान २५० रुपयांची वाढ होईल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

काही जाणकारांच्या मते टिव्हीच्या किमतींवर आयात शुल्क वाढीचा फारसा परिणाम जाणवणार नाही. गेल्या वर्षी भारतात ७००० कोटींचे टीव्ही आणि त्यासाठी लागणारे साहित्य आयात करण्यात आले होते. दरम्यान स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने याआधी चिनी वस्तूंवर शुल्क वाढ केली होती.

देशात ३२ इंच टीव्हीसाठी ओपन सेलची किंमत २७०० रुपये आहे.४२ इंचीच्या टीव्हीसाठी ४००० ते ४५००० रुपये किंमत आहे. ५ टक्के शुल्क वाढल्यास ओपन सेलच्या किमतीत केवळ १५० ते २५० रुपये वाढ होणार आहे. टीव्ही आणि त्यात वापरणाऱ्या पॅनलसाठी २० टक्के सीमा शुल्क २०१७ पासून लागू आहे. यामुळे टीव्ही आयातीवर काही प्रमाणात अंकुश बसला आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यामध्ये मध्यमवर्गाचे योगदान मोठे असल्याचे पंतप्रधानांनीही मान्य केले आहे. समाजातील हा वर्ग कोणाच्याही दयेवर, साह्यावर जगत नाही या शब्दांत त्यांनी मध्यमवर्गाची स्तुती केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही प्रामाणिकपणे, वेळेवर कर भरणाऱ्या मध्यमवर्गाची दखल घेतली आहे. अर्थव्यवस्था खुली केल्यापासून सातत्याने प्रत्येक सरकारने विदेशी गुंतवणूकदारांसमोर देशातील मध्यमवर्गाचे गोडले गायले आहेत. परंतु विविध योजना आखताना मध्यमवर्गासाठी योजना आखल्याचे अभावानेच दिसून आले आहे.⭕

Previous article🛑 मनसेचे सविनय कायदेभंग आंदोलन… ! मनसे सैनिकांनी लोकलने प्रवास केलाच 🛑
Next article*कोरोना योद्धा एक कर्तव्यदक्ष महीला मुख्याधिकारी* *युवा मराठा न्युजकडून झाला सन्मान*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here