Home मराठवाडा जवाहर विद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

जवाहर विद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

299
0

राजेंद्र पाटील राऊत

जवाहर विद्यालयात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न.

परभणी,(शत्रुघ्न काकडे पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
टोकियो ऑलिंपिक पंधरवाडा निमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी यांच्या वतीने जिल्हास्तरीय विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण जवाहर विद्यालय जिंतूर येथे आज करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी मा.श्री.के.डी.वटाणे साहेब उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी चे श्री.नरेंद्र पवार, जिल्हा संघटक क्रीडा कार्यालय परभणी च्या श्रीमती माधुरी जवने, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे श्री.प्रकाश पंडित, सायकल समूह ग्रुप चे अध्यक्ष श्री.देवेंद्र अण्णा भुरे, जिंतूर रॅडोनर्स आर.आर.चे शहजाद पठाण, प्राचार्य तथा JVJ SPORTS ACADEMY चे अध्यक्ष श्री.बळीराम वटाणे, जेष्ठ शिक्षक श्री.एस.एस.इंगळे सर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन संपन्न झाल्यानंतर जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा, रांगोळी, चित्रकला स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत सर्वात जास्त विद्यार्थी सहभाग हा जवाहर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा होता. यात जिल्ह्यातून प्रश्नमंजुषा स्पर्धेत मुक्तेश्वर सत्यनारायण हरकळ प्रथम, कु.गीता संदीप गाजरे द्वितीय, चंद्रकांत विजयकुमार चव्हाण तृतीय, कु.नेहा संतोष शेळके उत्तेजनार्थ तर रांगोळी स्पर्धेत जिल्ह्यातून कु.साक्षी बाबाराव कुटे प्रथम, कु.अनुष्का अशोक साबने, कु.श्रद्धा गणेश धडके उत्तेजनार्थ तसेच चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातून हर्षवर्धन शाम शिंबरे द्वितीय, रुद्रप्रताप बळीराम वटाणे तृतीय तर उत्तेजनार्थ कु.द्रौपदी बालाजी मुदनर, कु.प्रियल दत्तात्रय लाटकर, कु.सांची चंद्रकांत खिल्लारे, कु.अनुष्का अशोक साबने, यश विजय राठोड, व समर्थ प्रदीप कनकदंडे इत्यादी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यानंतर श्री.नरेंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी अशाच स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले तर श्रीमती माधुरी जवने यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे व विद्यालयाचे कौतुक करत मार्गदर्शन केले. यानंतर शहजाद पठाण यांनी शाळेने राबवलेल्या ऑनलाइन तासिकेचा उल्लेख करत विद्यालयाचे अभिनंदन केले तर अध्यक्षीय समारोपात श्री.के.डी.वटाणे साहेब यांनी विद्यार्थ्यांना असंच यश संपादन करावे अशा शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कल्याण भोसले सर यांनी केले तर आभार श्री.एस.पी.लांडगे सर यांनी मांडले तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा विभागप्रमुख श्री.रामप्रसाद अंभुरे सर, JVJ SPORTS ACADEMY चे मुख्य कोच शेख शाहरुख सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here