Home विदर्भ नेलगुंडा येथे भूमकल आंदोलन दिवस साजरी..

नेलगुंडा येथे भूमकल आंदोलन दिवस साजरी..

150

राजेंद्र पाटील राऊत

नेलगुंडा येथे भूमकल आंदोलन दिवस साजरी..                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) 

दिनांक 10 फेब्रुवारी 2022 रोजी भामरागड पारंपरिक इलाका गोटुल समिती व आदिवासी विध्यार्थी युवा संघटना तर्फे मौजा नेलगुंडा येथे भूमकल आंदोलनाचे महानायक शाहिद गुंडाधुर दुर्वे यांच्या 112 व्या स्मृती दिनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला..

यावेळी नेलगुंडा येथील गोटूल भूमी मध्ये कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते आदिवासी समाजाचा सप्तरंगी झेंडा पडकवून, आदिवासी समाजाचे महापुरुषांचे फोटोला दीप प्रज्वलित व हार हार्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले..

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य श्री.अँड.लालसु नोगोटी होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून भामरागड प.स.सभापती सौ.गोईताई कोडापे,जि.प.सदस्य ज्ञानकुमारी कोशी,उपसभापती श्री.सुखराम मडावी, श्री.लक्ष्मीकांत बोगामी,महेश वरसे,होते.पेरमिलीचे उपसरपंच श्री.सुनील सोयाम,शामराव येरकलवार,श्रीकांत बंडामवार आदि होते..

यावेळी कार्यक्रमात भूमकल आंदोलनाचे महानायक शाहिद गुंडाधुर दुर्वे यांच्या आंदोलन बदल माहिती देण्यात आले व भारत देशामध्ये इंग्रजी सरकार विरुद्ध आंदोलन केलेले सर्व आदिवासी समाजातील महापुरुषांचे इतिहासाची उजळणी करण्यात आले तसेच आदिवासी संस्कृती, रीती रिवाज, प्रता परंपरा टिकवून ठेवणे, आदिवासी समाजाचा पारंपरिक व संवैधानिक हक्क अधिकार मिळण्यासाठी म्हणून आपण संपूर्ण आदिवासी समाज एकत्र राहून, संघर्ष केला पाहीजे. तरच आपला आदिवासी समाज पुढे जाऊ शकतो असे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले..

यावेळी भामरागड इलाका पट्टीतील आदिवासी समाजातील कर्मचारी वर्ग, पट्टीतील सर्व गाव – भुमिया, गायता, पेरमा सह महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Previous articleधानोरा ते आसेगाव कुंभी रस्त्याचा दुरुस्ती साठी पुकारलेल्या रस्तारोको आंदोल नाला ब्रेक(मागण्या मान्य झाल्याच्या परिणाम)
Next articleदेवळा तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलनाचा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.