Home विदर्भ धानोरा ते आसेगाव कुंभी रस्त्याचा दुरुस्ती साठी पुकारलेल्या रस्तारोको आंदोल नाला ब्रेक(मागण्या...

धानोरा ते आसेगाव कुंभी रस्त्याचा दुरुस्ती साठी पुकारलेल्या रस्तारोको आंदोल नाला ब्रेक(मागण्या मान्य झाल्याच्या परिणाम)

366
0

राजेंद्र पाटील राऊत

धानोरा ते आसेगाव कुंभी रस्त्याचा दुरुस्ती साठी पुकारलेल्या रस्तारोको आंदोल नाला ब्रेक(मागण्या मान्य झाल्याच्या परिणाम)                                                                           वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
आसेगाव(पो.स्टे.)
येथील धानोरा ते कुंभी रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाल्याने व रस्त्यावर वाहन चालविणे कठीण होऊन या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाडल्याने येथील समाजासाठी तळमळणारे नागरिकांनी रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास रास्तारोको आंदोलन पुकारला होता.
धानोरा ते आसेगाव कुंभी या मार्गावरून अन्सिंग व मंगरुळ पीर जाणाऱ्यांची नियेमीत धावपळ असते मात्र मागील अनेक वर्षंपासून या रस्त्याची पूर्णपणे दुरुस्ती ना करता थातुर मुतुर डागडुगी करून लोकांचे आश्रू पुसण्याचे काम करण्यात येत होते मात्र यावेळेस हा रस्ता डागडुगी करण्या लायक न राहिल्यामुळे व पहिल्या पेक्षा जास्त खराब झाल्यामुळे यावर अपघाताचे प्रमाण खूप वाडले आहेत यामुळे आसेगाव कुंभी शिवणी नांदगाव येथील समाजसेवक सुभाष कवरे विष्णु फड दाउद खान मुख्तार सागर डा.भगवान भेंडेकर उत्तम कुटे शाकीर शेख आदींनी पुढाकार घेऊन उप अभियंता सार्वजानिक बांधकाम मंगरूळ पीर सह जिल्हाधिकारी तहसिलदार ठाणेदार जिल्हापरिषेच्या अध्यक्ष यांना निवेदन देऊन पूर्ण रस्ता डांबरीकरण करण्यात यावा अन्यथा दिनांक १४ फेब्रुवारी रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात यईल असा इशारा दिला होता.याची दखल महणुन दिनांक १२ फेब्रुवारी रोजी उप अभियंता सार्वजानिक बांधकाम मंगरूळ पीर यांनी निवेदन करता याची भेट घेऊन या पूर्ण रस्त्याचा बांधकामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेला आहेत ते लवकरात लवकर तरतूद मध्ये येतील सध्या या रस्त्याचे खड्डे बुजण्याचा निधी प्राप्त झाला असून एका आठवड्यात कामाला सुरुवात करण्यात येईल या लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आला आहे तरी याभागातील जनतेने याकरिता सर्वाचे आभार मानले आहेत

Previous articleअनसिंग येथील ३५७ राशन कार्ड धारक धान्यापासून वंचित
Next articleनेलगुंडा येथे भूमकल आंदोलन दिवस साजरी..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here