Home विदर्भ अनसिंग येथील ३५७ राशन कार्ड धारक धान्यापासून वंचित

अनसिंग येथील ३५७ राशन कार्ड धारक धान्यापासून वंचित

130
0

राजेंद्र पाटील राऊत

अनसिंग येथील ३५७ राशन कार्ड धारक धान्यापासून वंचित
मंगरुळपीर,(रितेश गाडेकर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)                                                                             वाशिम तालुक्यातील अनसिंग येथील ३५७ राशन कार्ड धारकांना मागील पाच वर्षापासून शासनाकडून दर महा मिळणाऱ्या धान्याचा व मोफत धान्याचा पुरवठा होत नाही या सर्व वंचित राशनकार्ड धारकांना जिल्हा प्रशासनाने १५ दिवसा मध्ये धान्य पुरवठा करावा अन्यथा त्या वंचित नागरिकांसह आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी जि.प. सदस्य नत्थुजी कापसे यांनी अनसिंग येथील संतोषी माता बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानांमधील ८४ राशन कार्ड धारक, रेणुका माता महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये १६७ राशन कार्ड धारक आणि ए.एस.बाजडयांच्या स्वस्त धान्य दुकानावर १०६ राशन कार्ड धारक यांना मागील पाच वर्षापासून शासनाकडून दरमहा मिळणारे धान्य व मोफत धान्य मिळाले नसल्याची बाब नमूद केली आहे. अनसिंग येथील तिन्ही स्वस्त धान्य दुकानातील धान्यापासून वंचित असलेल्या ३५७ राशन कार्डामध्ये एकूण १४१३ युनिट असून हे १४१३ नागरिक मागील पाच वर्षापासून धान्य मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अनसिंग येथील धान्यापासून वंचित असलेल्या ३५७ राशन कार्ड धारकांना त्वरित धान्याचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी माजी जि.प. सदस्य नत्थुजी कापसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Previous articleपिंपळगांव निफाड रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू
Next articleधानोरा ते आसेगाव कुंभी रस्त्याचा दुरुस्ती साठी पुकारलेल्या रस्तारोको आंदोल नाला ब्रेक(मागण्या मान्य झाल्याच्या परिणाम)
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here