Home माझं गाव माझं गा-हाणं आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच, निष्क्रिय समित्या मुळे खेडेगावात कोरोनाचा शिरकाव

आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच, निष्क्रिय समित्या मुळे खेडेगावात कोरोनाचा शिरकाव

135
0

राजेंद्र पाटील राऊत

आपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच,
निष्क्रिय समित्या मुळे खेडेगावात कोरोनाचा शिरकाव
वाखारी, (प्रतिनिधी दादाजी हिरे युवा मराठा न्युज नेटवर्क)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहताहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला अध्यक्षांनी राम राम ठोकल्याने खेडोपाडी गावागावात कोरोनाचा फैलाव होत आहे. कोरोना रोखण्यासाठी पुन्हा ग्रामआपत्ती समित्यांना गती देण्याची गरज आहे.
गतवर्षी ग्राम आपत्ती कमिटी स्थापन झाली. त्या काळामध्ये डिझेल, पेट्रोल बंद केले होते, आपत्ती समितीतील सदस्यांनी डिझेल पेट्रोल मिळण्यासाठी ओळखपत्राचा भरपूर प्रमाणात उपयोग केला होता. तर अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कमिटीने उत्कृष्टरित्या काम केले. कोरोनाचे संकट कमी झाले. परंतु पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. त्यामुळे ग्राम आपत्ती समित्या कार्यनित करण्याची गरज आहे.
अनेक गावातून ग्राम आपत्ती समितीने चांगल्या प्रतीचे काम केले होते. त्या गावांमध्ये कोरना चा शिरकाव झाला नव्हता. परंतु ज्या गावांमध्ये ग्राम आपत्ती समिती कागदावरच राहिली अशा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कारण बाहेरून येणारे नागरिक, बाहेर जाणारे नागरिक व गावातील व्यवस्था याच्यावरती कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोना चा शिरकाव झाला होता.
या ग्राम आपत्ती समितीमध्ये अध्यक्ष सरपंच, सचिव तलाठी होते. तर कृषी सहाय्यक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश ग्राम आपत्ती समितीमध्ये आहे.
सध्या कोरना ग्राम आपत्ती समिती व्यवस्थापन समित्या कागदावरच राहिल्या आहेत. प्रत्यक्षात समितीचे कामकाज शून्य आहे. तरी लोकप्रतिनिधींनी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी पुढाकार घेऊन गावोगावच्या ग्राम आपत्ती समित्या पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. यामध्ये सामाजिक तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. कोरोना नियंत्रणासाठी जनजागृती करणे, सेनीटायझर व सोशल डिस्टन्स पाळणे, अशा उपाययोजना करण्याची गरज आहे यासाठी सर्वच नागरिकांनी काळजी घेऊन पुढाकार घेऊन पुन्हा ग्राम आपत्ती समित्या सक्रीय कराव्यात

Previous articleसंचारबंदीमुळे लोककलावंत, नाट्य व चित्रपट कलावंत यांच्यावर येणार उपवसमारीची वेळ
Next articleगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रामेश्वर कृषी उत्पन्न मार्केट ची नवीन निर्मिती करण्यात आली .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here