Home उतर महाराष्ट्र पिंपळगांव निफाड रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू

पिंपळगांव निफाड रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू

79
0

राजेंद्र पाटील राऊत

पिंपळगांव निफाड रोडवर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू

नाशिक-सागर कटाळे युवा मराठा न्युज नेटवर्क चॅनेल नाशिक ब्युरो चीफ                                                                निफाड तालुक्यातील पिंपळगाव गावालगत असलेले पाचोरे वणी येथील युवक लग्नासाठी मुलगी बघायला जात असताना पिंपळगाव-निफाड रोडला त्याच्या गाडीचा अपघात होऊन त्यात मागे बसलेल्या एका ५५ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार शांताराम एकनाथ आव्हाड (वय २५) आणि सुकदेव रमन ससाणे (वय ५५, दोघे रा. पाचोरे वणी) हे हिरो होंडा एम एच १५ एच ए १८१६ या दुचाकीने पिंपळगावहून निफाडच्या दिशेने जात असतांना एम एच ४१ ए १७१७ या क्रमांकाच्या मालवाहतूक कंटेनरने त्यांच्या मोटारसायकल धडक दिली. या अपघातात चालक शांताराम आव्हाड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पाठीमागे बसलेले सुकदेव रमन ससाणे हे खाली कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला कानाजवळ गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.निफाड येथील शासकीय रुग्णालायत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पाचोरे वणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी संपन्न झाला. याप्रसंगी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, पोलीस हवालदार संतोष ब्राम्हणे करत आहेत.

Previous articleरानडुकराच्या हल्यात शेतकरी गंभीर जखमी.
Next articleअनसिंग येथील ३५७ राशन कार्ड धारक धान्यापासून वंचित
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here