Home उतर महाराष्ट्र देवळा तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

देवळा तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आंदोलनाचा इशारा

215
0

राजेंद्र पाटील राऊत

भिला आहेर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क देवळा:- विजभरनियमनात बदल शेतकरी संतप्त. पूर्वीप्रमाणेच दिवसा वीज मिळावी अन्यथा कुठल्याही क्षणी आंदोलन.
देवळा तालुक्यातील धोबीघाट येथील विद्युत उपकेंद्रामार्फत मेशी आणि दहिवड ह्या दोन गावांना वीजपुरवठा होत आहे गेल्या दोन वर्षांपासून ह्या उपकेंद्राला सौरउर्जेपासून वीजपुरवठा होत असून दोन वर्षांपासून शेतीपंपासाठी दररोज दिवसा सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजपुरवठा होत होता.परंतु गेल्या दोन महिन्यांपासून विजवीतरण कंपनीने सदरील गावांची वीज बिल वसुली कमी असल्याचे कारण दाखवत इतर गावांप्रमाणेच आठवड्यातून तीन दिवस दिवसा व चार दिवस रात्री अशा पध्दतीने वीजपुरवठा केला जात आहे याबाबत मेशी ग्रामपंचायत कार्यालयात विजवीतरण कंपनीचे कळवण येथील कार्यकारी अभियंता राठोड आणि इतर काही अधिकारी व गावातील शेतकरी यांची संयुक्त बैठक होऊन वीजबिल वसुलीसाठी योग्य ते सहकार्य करून पूर्वीप्रमाणेच शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा केला जाईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी शेतकऱ्यांना आश्वासित केले. शेतकऱ्यांनी देखील कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देत योग्यप्रकारे वीजबिल भरणा देखील केला तरीही सदर बैठकीला दोन महिने उलटूनही शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा होत नसल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांबद्दल शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संतापाची लाट पसरली असून लवकरात लवकर पूर्वीप्रमाणेच शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा न केल्यास कुठलीही पूर्वसूचना न देता आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकऱ्यांमार्फत देण्यात येत आहे.
प्रतिक्रिया:-१) धोबीघाट विद्युतउपकेंद्राला सौरउर्जेच्या प्लॅनपासून वीजपुरवठा सुरू असून तो सौरऊर्जेचा प्लॅन आमच्या दहिवड हद्दीत असून जर मेशी आणि दहिवड ह्या गावांना शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा होत नसेल तर सदर सौरऊर्जेचा प्लॅन हा बंद पाडण्यात येईल .
संजय देवरे — तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना
२) विजवीतरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक स्थिती चांगली नसतांना देखील योग्यप्रकारे वीजबिल भरणा केला असल्यावर देखील कंपनी कडून शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक त्वरित थांबवून शेतीपंपासाठी दिवसा वीज मिळावी.
तुषार शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते, मेशी

Previous articleनेलगुंडा येथे भूमकल आंदोलन दिवस साजरी..
Next articleजिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाणे जमादारास मारहाण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here