Home Breaking News *जिभेच्या तलवारबाजी लोकं फार काळ सहण करण्याची परिस्थिती* *नाही.*

*जिभेच्या तलवारबाजी लोकं फार काळ सहण करण्याची परिस्थिती* *नाही.*

93
0

*जिभेच्या तलवारबाजी लोकं फार काळ सहण करण्याची परिस्थिती* *नाही.*

*कोल्हापूर प्रतिनिधी युवा मराठा न्युज*

सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. मराठा संघटनांसह कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानं राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एससी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला. आरक्षणावरूनच संभाजीराजे यांनी तलवार काढण्याचा इशारा दिला होता. त्यावर शिवसेनेनं संभाजीराजेंना सवाल केला आहे.
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पोलीस भरती करू नये, नोकर भरतीसाठीच्या ‘एम.पी.एससी.’सारख्या परीक्षा घेऊ नयेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली होती.
त्यानंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपाचे राज्य सभेतील खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी एम.पी.एससी. परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आंदोलनाचा व ‘वेळ आल्यास तलवारी काढू’, असा इशारा दिला होता.
“जातीय आरक्षणांसाठी महाराष्ट्रात तलवारी उपसण्याची भाषा सुरू आहे. अशी भाषा करणारे राज्यातील तालेवार लोक आहेत. आता दसराही येत आहे. त्यामुळे शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्र नेमकी कोण काढतंय, शस्त्र कोणावर चालवली जातील, ते पाहावेच लागेल. प्रकाश आंबेडकर यांची जीभ घसरली व म्हणाले, ‘एक राजे बिनडोक आहेत, तर दुसऱ्या राजांचे आरक्षण सोडून वेगळेच काही चालले आहे.’ कोल्हापूर व सातारचे ‘राजे’ मराठा आरक्षणात उतरले आहेत. त्यावर आंबेडकर यांनी हे विधान केले. प्रश्न कोणी बिनडोक असण्याचा किंवा तलवारी चालविण्याचा नाही. जिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत व त्यावर कोणी गांभीर्याने बोलायला तयार नाही,” अशी भूमिका शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून मांडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here