*व-हाणेत गावठाण जागेचा प्रश्न पत्रकार भवनसाठी घोर अडवणूक* *व-हाणे ग्रामपंचायतीच्या (अ)कर्तबगारीची चौकशी सुरु*
*मालेगांव,(कार्यालयीन प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-* शासनाच्या नियमांना व आदेशाना त्याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रव्यवहाराला कवडीचीही किंमत न देता किंवा शासकीय कागदपत्रांचे महत्त्व आणि गांभिर्य समजून न घेता,फक्त स्वतः चा हट्टी व जिद्दी स्वभाव जोपासण्यासाठी शासनाच्या गावठाण जागेवर पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी अडवणूक करुन घोररित्या फसवणूक करणाऱ्या व-हाणे,ता.मालेगांव जि.नाशिक येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका श्रीमती सुवर्णा साळुंखे यांच्या कारकिर्दीतील (अ) कर्तबगारीच्या कामांची आजपासून मालेगांव पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी गुलाब राजबन्शी यांचेकडून चौकशी सत्र सुरु झाल्याचे खात्रीलायक वृत आहे.
याबाबत पार्श्वभूमी अशी की,व-हाणे गावी मराठी शाळेजवळ गावठाण जागा हि शासकीय मालकीची उपलब्ध असून,त्या जागेवर फेब्रुवारी महिन्यात ग्रामसेविका सांळुखे मँडम यांच्या हस्ते तर तत्कालीन सरपंच श्रीमती संगिता पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि व-हाणे गावाच्या नागरिकांच्या आँखो देखी सार्वजनिक पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.सदरची पाणापोई आजतागायत कार्यरत असून,हि पाणपोई युवा मराठा न्युजच्या व्यवस्थापकीय संपादक श्रीमती अलका शांतीलाल बच्छाव यांनी स्वखर्चाने चालविली आहे.असे असतांना ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेल्या या गावठाण शासनाच्या मालकीच्या जागेची मागणी पत्रकार अलका बच्छाव यांनी शासकीय परिपत्रकाप्रमाणे रितसर दिनांक १०जुलै २०२० रोजी अर्जासह ग्रामपंचायत व-हाणे यांचेकडे केल्यावर ग्रामसेविका सांळुखे मँडम यांनी मुद्दामच अडवणूक करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिका-यांची परवानगी आणा वगैरे सारखी कारणे सांगून वेळ मारुन नेला व सदर जागा मला देण्याचा अधिकारच नाही.वगैरे भुलथापा देऊन वेळ मारुन नेला. त्यानंतरही मालेगांवचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांनी ग्रामसेविका सांळुखे यांना सदर जागेवरील पत्रकार निवासस्थान व भवन प्रश्नी तात्काळ कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे आदेश देऊनही ग्रामसेविका सांळुखे यांनी त्या पत्राला महत्त्वच दिले नाही.किंवा कार्यवाही केली नाही म्हणजे ग्रामसेविका सांळुखे मँडम यांच्या नजरेत शासनाचे परिपत्रक आणि गटविकास अधिकाऱ्यांचे पत्र कवडीशुन्य ठरते असाच याचा अर्थ निघतो.
*जागा देणारच नाही म्हणणा-या ग्रामसेविका सांळुखेचे वाचनालयावेळी नियम कोठे होते?* पत्रकार निवासस्थान व भवनला जागा देणारच नाही असा पावित्रा घेणाऱ्या ग्रामसेविका सांळुखे मँडम यांचा व-हाणेतील वाचनालयाबाबत नियम कोठे होता?सदर वाचनालयाला ग्रामपंचायतीने गावठाण जागा उपलब्ध करुन देताना जिल्हाधिका-यांचे पत्र होते का?कुठल्या आदेशाने भुखंडाचे श्रीखंड वाचनालयाला बहाल करण्यात येऊन तसा नमूना नंबर ८ चा उतारा देखील देण्यात आला.याचाही शोध आता चौकशी अधिकारी राजबन्शी यांनी घ्यावा,म्हणजे नेमका काय झोल सुरु आहे याचाही पर्दाफाश होईल.ज्या ग्रामपंचायतीच्या ताब्यातील गावठाण जागेवर सध्या पाणपोई सुरु आहे आणि त्याच जागेची रितसर पत्रकार निवासस्थान व भवनसाठी मागणी केल्यावर ती जागा देता येणार नाही.ग्रामस्थांचा विरोध आहे!तेथे सरकारी आरोग्य उपकेंद्र येणार आहे, सारख्या गोष्टी ग्रामसेविका सांळुखे मँडम या अधांतरी आधारावर कथन करीत आहेत.ग्रामस्थांचा विरोध आहे म्हणजे नेमके कोणते ग्रामस्थ? हे अद्याप तरी सांळुखे मँडम यांनी स्पष्ट केलेले नाही,किंवा तेथे येणाऱ्या सरकारी आरोग्य केंद्राच्या प्रस्तावीत इमारतीबाबत कुठलाही कागदोपत्री केलेला पत्रव्यवहार दाखवलेला नाही.याचाच अर्थ ग्रामसेविका सांळुखे या नेमके कुणाच्या दबावाखाली काम करीत आहेत हे मात्र एक प्रश्नचिन्हच आहे..!
*जर सरकारी आरोग्य उपकेंद्र होणार आहे तर मग पाणपोईला जागा दिलीच कशी?* तस बघितलं तर आज ज्या जागेवर पाणपोई सुरु आहे,एका निराधार विधवा महिलेने स्वतःच्या पोटाला चिमटा देत वेळप्रसंगी उपाशी राहून सामाजिक दृष्टिकोन नजरेसमोर ठेऊन पत्रकार अलका बच्छाव यांनी हि पाणपोई चालविली आहे.आणि त्याच पाणपोईचे मोठया गाजावाज्यात उदघाटन ग्रामसेविका सांळुखे मँडम यांनीच केले.मग त्यावेळी तेथे शासकीय आरोग्य उपकेंद्र मंजूर नव्हते का? नेमका गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचा आदेश देताच ती जागा नेमकी शासकीय कामासाठी आरक्षित असल्याचे ग्रामसेविका सांळुखे यांना कसे दिसले? मात्र त्याबाबत अधिकृतपणे कागदोपत्री काहीही माहिती उपलब्ध नाही.म्हणजे या शासनाच्या भुखंडाचे श्रीखंडही नेमके कुणाच्या घश्यात घालण्याचा डाव आहे.हे देखील चौकशी अधिकारी राजबन्शी यांनी निपक्षपाती पध्दतीने चौकशी करुन चव्हाटयावर आणणे गरजेचे आहे.
Home Breaking News *व-हाणेत गावठाण जागेचा प्रश्न पत्रकार भवनसाठी घोर अडवणूक* *व-हाणे ग्रामपंचायतीच्या (अ)कर्तबगारीची चौकशी...