राजेंद्र पाटील राऊत
युवा मराठा च्या पाठपुराव्याला मोठे यश….✍️
उर्जा मंत्री नितीन राऊत यांचे महावितरण कंपनीला विजेचे दर कमी करा, शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.
ठाणे (अंकुश पवार, ठाणे शहर प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनेल)
या विषयावर युवा मराठा न्युज चॅनेल ने
“विजेचा लपंडाव…. दि.७.१०.२०२१ रोजी
“विजेचा लपंडाव पुन्हा सुरू…लोडशेडींग संकटं अटळ
दि.११.१०.२०२१ रोजी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.
त्याअनुषंगाने आज दि.१२.१०.२०२१ रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले.
नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना 8 तास दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि कृषीपंप वीज वाहिन्या अतिभारीत (ओव्हरलोड) होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे. रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील किती ठिकाणी आणि कोणते रोहित्र दिवसा 8 तास वीज देण्यास सक्षम नाही, हे शोधून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
त्यामुळे युवा मराठा न्युज चॅनेल सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारे आणि सरकारला त्याची दाद द्यायला लावणारे सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे.




