कोल्हापूर : नवे पारगाव (ता.हातकणंगले ) येथील मुंबईच्या विलेपारले ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर मनोहर डोईजड याना उल्लेखनीय कामगिरी बद्दल बृहन्मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे – पाटील यांच्या हस्ते सन्मानित केले.
विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या पथकाने उच्च प्रतीचे कौशल्य दाखवून सण २०२१ मधील हा गुन्हा काही महिन्यातच उघडकीस आणून उल्लेखनीय काम केले. किशोर डोईजड व त्यांच्या सहकार्यांच्या पथकाने चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांच्या कडून ७ कोटी १० लाख ७८ हजार रोख रक्कम, ४८ लाख ५० हजार हजाराची वाहने व ११ लाख ४८ हजारचे दागिने असे मिळून ७ कोटी ७० लाख ७६ हजार जप्त केले. या कामगिरीबद्दल त्यांच्या पथकाचा सन्मान करण्यात आला.