Home कोल्हापूर मेडिकल ,एम आर,केमिस्टअसोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रुग्णवाहिका उपचारसुविधा

मेडिकल ,एम आर,केमिस्टअसोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रुग्णवाहिका उपचारसुविधा

201
0

पेठ वडगांव : प्रतिनिधी दि.18/5/21 हेरले (ता.हातकणंगले ) येथे प्राथमिक शाळेमध्ये वैश्विक साथ रोखण्यासाठी सकारात्मक मोहिम म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मेडिकल असोसिएशन एम आर असोसिएशन केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रुग्णवाहिका सुविधा ताप उपचार केंद्र आरटीपीसीआर चाचणी व रॅपिड अँटिजन टेस्ट सुविधा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. रुग्णवाहिकेचा शुभारंभ जेष्ठ पत्रकार प्रा. राजगोंड पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या की, वैद्यकिय सेवेत असणारे खासगी वैद्यकिय व्यावसायिक, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन यांनी स्वंयम स्फुर्तीने सामाजिक भावनेतून ही आरोग्य सेवा मोहिम सुरू केली आहे हा उपक्रम स्तुत्य आहे. जिल्हा परिषदेच्या फंडातून यथाशक्ती आरोग्य सेवेस मदत देण्यासाठी तत्पर आहे अशी त्यांनी ग्वाही दिली.

हेरले मेडिकल असोसिएशन,मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने मराठी शाळेमध्ये रुग्णांना येण्या-जाण्यासाठी मोफत रुग्णवाहिका , ताप उपचार केंद्र, आरटिपिसीआर चाचणी, रॅपिड अँटिजेन चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.या केंद्रामध्ये रुग्णांचा ताप व अन्य आजाराची तपासणी केली जात आहे यामध्ये संशयित रुग्ण आढळला त्यांचे आरटीपिसीआर किंवा रॅपिड अँटिजेन चाचणी याच केंद्रात केली जात आहे. यामध्ये रुग्णाची पॉझिटिव्ह चाचणी आल्यास त्यांना अतिग्रे येथील कोविड सेंटर मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व विराचार्य संस्थेच्या दोन रुग्ण वाहिकेच्या माध्यमातून भरती करण्यात येणार आहे. ही मोहिम ३१ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेमुळे गावातील कोरोना संसर्ग आटोक्यात येऊन गाव निश्चित कोरोना मुक्त होण्यासाठी मदत होणार आहे.
याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ.पद्माराणी राजेश पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राहुल देशमुख, प्रा. राजगोंड पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, मुनीर जमादार तलाठी एस ए बरगाले, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, माजी उपसरपंच संदीप चौगुले, विजय भोसले, राहुल शेटे ,उपसरपंच सतीश काशीद, ग्राम. सदस्य बतुवेल कदम, दादासो कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मेडिकल असोसिएशनचे डॉ. महावीर पाटील, डॉ. अमोल चौगुले, डॉ.प्रविण चौगुले, डॉ. राजगोंड पाटील,डॉ. सुरेखा आलमान,डॉ. इमरान देसाई, डॉ. प्रवीण चौगुले,डॉ. नितीन चौगुले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी हेरले मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचे रजत मुल्ला, विशाल परमाज, श्रेनिक राजोबा, राहुल कराळे, सुरज भोसले, किरण चौगुले, मृणाल पाटील, उमेश पाटील, रोहित मुंडे, पंकज मिरजे, प्रवीण सुतार ,सोमनाथ माने, अमोल शेटे,ओंकार मुंडे ,सौरभ कोरे, प्रकाश कुरणे, स्वप्नील जाधव, वेदू किराणे,संदीप मिरजे, राहुल कारंडे ,सचिन पाटील, राहुल कटकोळे,अश्फाक देसाई, आकाश तिवडे, अनिकेत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
केमिस्ट असोसिएशनचे शीतल पाटील, अभिषेक मोहिते,अविनाश चौगुले, अनिल पाटील, संदीप हनमंत,संदीप चौगुले, लतिफ नायकवडी आदी उपस्थित होते.

 

Previous articleकोल्हापूरात अवनि संस्थेतील पंधरा मुलींना व दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाची लागण
Next articleसहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांचा सन्मान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here