Home कोरोना ब्रेकिंग कोल्हापूरात अवनि संस्थेतील पंधरा मुलींना व दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाची लागण

कोल्हापूरात अवनि संस्थेतील पंधरा मुलींना व दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाची लागण

149
0

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूरात अवनि संस्थेतील पंधरा मुलींना व दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाची लागण

कोल्हापूर :(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-   गोरगरीब व अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेल्या पुईखडी येथील अवनि संस्थेतील पंधरा मुलींना तसेच दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याची गंभीर बाब सोमवारी समोर आली. या प्रकारामुळे अवनितील सर्वच मुलींना धक्का बसला असून, संस्थेचे पदाधिकारीही गडबडून गेले आहेत. या सर्व मुलींची प्रकृती उत्तम असून, त्यांना तातडीने शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले.

अवनिची एक शाळा व वसतिगृह पुईखडी येथे आहे. या ठिकाणी सध्या २५ मुली राहत आहेत. त्यातील दोघींना सोमवारी सकाळी अचानक ताप आला.
संस्थेच्या प्रमुख प्रा. अनुराधा भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता याची माहिती जिल्हास्तरीय बाल कल्याण समितीला कळविली. समितीच्या सदस्या मुजावर यांनी तातडीने महानगरपालिकेचे एक पथक पाठवून त्यांच्या सहकार्याने या दोन मुलींची रॅपिड अँटिजन चाचणी केली, तर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

सर्व मुली एकत्र राहत, खेळत असतात. त्यामुळे नंतर सर्वच्या सर्व २५ मुलींची तसेच तेथे काम करणाऱ्या दोन स्वयंपाकी महिला यांचीही अँटिजन चाचणी करण्यात आली. दुर्दैवाने त्यात आणखी १३ मुली तसेच दोन स्वयंपाकी महिला यांच्या चाचणीचे अहवालही पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अवनि संस्थेला धक्का बसला. महापालिका पथकाने या सर्व मुलींना शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्याचा निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली. या सर्वांना केएमटी बसमधून कोविड सेंटरला देण्यात आले. कोरोनाबाधित आढळलेल्या मुली या सहा ते अठरा वर्षे वयोगटातील आहेत.

Previous articleयुवा मराठा न्युजचा प्रथम वर्धापनदिन जाहिरातदाराचे मनपुर्वक आभार!!
Next articleमेडिकल ,एम आर,केमिस्टअसोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत रुग्णवाहिका उपचारसुविधा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here