Home जालना धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खांद्याला खांदा लावून लढू ः सामाजिक...

धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खांद्याला खांदा लावून लढू ः सामाजिक कार्यकर्ते दिपक डोंगरे जांबखेड येथील आमरण उपोषणाला पाठींबा

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20231125_063457.jpg

धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत खांद्याला
खांदा लावून लढू ः सामाजिक कार्यकर्ते दिपक डोंगरे
जांबखेड येथील आमरण उपोषणाला पाठींबा
जालना (दिलीप बोंडे) ः धनगर समाजाला एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने अंबड तालुक्यातील जामखेड येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून या उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते दिपक डोंगरे यांनी भेट देवून पाठिंबा दिला आहे.
यावेळी बोलतांना दिपक डोंगरे म्हणाले की, धनगर समाजाला उदनिर्वाह करण्यासाठी त्यांना शेळी-मेंढी पालन करून ते आपली उपजिवीका भागवत आहे. मात्र, या गोर-गरीब समाजाच्या मागण्याकडे या सरकारने वारंवार दुर्लंक्ष केल्याचे विदारक चित्र वारंवार पहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारने आतातरी झोपेचे सोंग न घेता सकल धनगर समाजाला तातडीने आरक्षण द्यावे आणि आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण खांद्याला खांदा लावून लढू तसेच कोठेही मोर्चा, आंदोलने, उपोषणे झाले त्या ठिकाणी आप स्वतः सहभाग घेवून पाठींबा देणार असल्याचे आश्वासन सामाजिक कार्यकर्ते दिपक डोंगरे यांनी दिले.
पुढे बोलतांना डोंगरे यांनी सांगीतले की, धनगर समाज हा आपल्या उपजिविकेसाठी गावोगावी तसेच वाडी-वस्ती या ठिकाणी फिरून आपल्या संसाराचा गाडा हाकण्याचे काम करत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळाल्यास त्यांच्या पुढच्या पिढीला शैक्षणिक व इतर सवलती मिळाल्यास त्यांचाही मागासलेपणा दुर होईल असे देखील श्री डोंगरे यांनी सांगीतले.
या उपोषणाला पिंपळगावचे सरपंच हरीभाऊ शेळके, बावणेपांगरीचे सरपंच बाबासाहेब जोशी, शिवराम विर, निखील विर, कृष्णा कोल्हे, कृष्णा शेळके आदींनी उपोषणाला पाठींबा दिला. तसेच उपोषणकर्ते भगवान आबा भोजने, भगवान भोजने, देवलाल मंडलिक तसेच सरपंच रतन तारडे, ॲड. मनोज तारडे, मंजीत भोजनेे, पंकज मंडलिक, गणेश भोजने, डॉ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here