Home विदर्भ उमरखेड बस दुर्घटना : दोघांना वाचविण्यात यश – तिघांचे मृतदेह काढले पुलावरून...

उमरखेड बस दुर्घटना : दोघांना वाचविण्यात यश – तिघांचे मृतदेह काढले पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडण्याचे धाडस करू नये – जिल्हाधिकारी

117
0

राजेंद्र पाटील राऊत

उमरखेड बस दुर्घटना : दोघांना वाचविण्यात यश – तिघांचे मृतदेह काढले
पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडण्याचे धाडस करू नये
– जिल्हाधिकारी
यवतमाळ (ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- सप्टेंबर : आज सकाळी पावणे आठच्या दरम्यान बस क्रमांक एम एच- 14 बी टी-5018 ही नागपूर डेपोची नांदेड ते नागपूर जाणारी बस उमरखेड शहराजवळ उमरखेड ते पुसद रोड वरील दहागाव नाल्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातर्फे बचाव कार्य सुरू करण्यात आले. या घटनेत दोन प्रवाशाना सुखरूप बाहेर काढण्यात आले तर दोन प्रवाशी व वाहकाचा मृतदेह सापडला आहे.

दरम्यान पूर परिस्थीतीत किंवा अतिवृष्टी काळात नद्या, नाले दुथडी भरून वाहत असतांना पूल अथवा रस्त्यावर पाणी वाहत असल्यास अशा वेळी पूल ओलांडण्याचे धाडस कोणी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
अपघातग्रस्त बसमध्ये चालक व वाहक यांचेसह इतर चार प्रवासी असे एकूण सहा जण होते. प्रवाशापैकी शरद नामदेव फुलमाळी वय 27 वर्षे रा. करोळ ता. पुसद तसेच सुब्रमण्यम सूर्यनारायण तोकला वय 48 वर्ष या दोन व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तसेच शेख सलीम उर्फ बाबू शेख इब्राहीम वय 50 रा. वारा ह.मु. हैद्राबाद आणि इंदल रामप्रसाद महिंद्रे वय 35 रा. कारोळ ता. पुसद व बस वाहक भीमराव लक्ष्मण नागरिकर, घाट रोड नागपूर हे मृत झाले असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. बस चालक सुरेश रंगप्पा सुरेवार, नागपूर हे तापावेतो बसमध्येच अडकून असल्याची प्राथमिक माहिती तहसिलदार आनंद देवूळगावकर यांनी दिली आहे.
घटनास्थळी शिघ्र बचाव पथक पोहोचले असून बचाव कार्य सुरू आहे. उमरखेड पोलीसांमार्फत पंचनामा करण्यात आला असून जिल्हा प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी दुर्घटनास्थळी तळ ठोकला असून स्थानिक बचाव पथक, जिल्हा शोध व बचाव पथक व नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे.
संपुर्ण घटनेवर जिल्हाधिकारी अमोल येडगे लक्ष ठेवून आहेत. सध्या सर्व प्रकल्प 100 टक्के भरले आहेत व पावसामुळे त्यातुन पाण्याचा विसर्ग कमी अधिक प्रमाणात सुरू असल्याने नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज असून नदी, नाल्याचे पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असल्यास रस्ता किंवा पूल ओलांडण्याचे धाडस करू नये तसेच पुर व पाण्याच्या ठिकाणी जाणे टाळावे. नदीकाठच्या नागरिकांनी सावधगीरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

Previous articleआपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी चार कोटी 71 लाख रु. निधी जिल्ह्याला प्राप्त – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Next articleचिंचवे गावाजवळ भीषण अपघात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here