Home पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात गाव तिथं कोविड सेंटर: दिलीप स्वामी यांची माहिती.     ...

सोलापूर जिल्ह्यात गाव तिथं कोविड सेंटर: दिलीप स्वामी यांची माहिती.             

112
0

राजेंद्र पाटील राऊत

सोलापूर जिल्ह्यात गाव तिथं कोविड सेंटर: दिलीप स्वामी यांची माहिती.                            युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर
लोकं सोशल डिस्टनसिंगचं पालन करत नाहीत.त्यामुळे जे पॉझिटिव्ह आलेले आहेत व त्याच्या संपर्कात आलेले व्यक्ती यांच्यावर आपण भर देतोय.जेणेकरून अजून संख्या वाढली नाही पाहिजे.जे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यांच्यासाठी गावातच कोविड सेंटर आपण चालू करणार आहोत.अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता 100 गावात कोविड सेंटर उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या धर्तीवर आजपर्यंत 60 गावात कोविड सेंटर उभी करण्यात आली आहेत अशी माहिती दिलीप स्वामी यांनी दिली.

या पुढे बोलताना ते म्हणाले की, यामुळे जरी पॉझिटिव्ह आला तरी गावातच राहायला मिळणार आहे म्हणून अनेकजण कोविड टेस्ट साठी समोर येत आहे.पॉझिटिव्ह लोकांच्या मनात कायम भीती होती की आपण पॉझिटिव्ह आलो तर तालुक्याच्या ,जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागेल.या भीतीने लोकं समोर येत नव्हती.
काही जण पॉझिटिव्ह असल्याचे माहीत असलं तरी समोर येत नव्हती.लक्षणं जाणवली तरी पण काही जण लपवत होती.त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी प्रत्येक गावातच कोविड सेंटर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून सामाजिक व मानसिक आरोग्य सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय.

यातून आम्ही गावकऱ्यांना सुद्धा उद्या सगळ्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकऱ्यांना सुद्धा काही प्रमाणात तुम्ही सक्षम राहावा यासाठी आम्ही प्रत्येक गावात 15 ते 20 मिनिटांचे मार्गदर्शन करणार आहोत. गावातील एनजीओ,डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांच्या साथीने गावात कोविड सेंटर उभी करणार आहात.त्यासाठी लागणारा स्टाफ प्रशासन पुरवणार आहे. ताणतणाव व्यवस्थापनामुळे लोकं सकारात्मक प्रतिसाद देत आहेत असेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here