Home मुंबई डॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन     

डॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन     

115
0

राजेंद्र पाटील राऊत

डॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन                      (विजय पवार महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

मुंबई दि. ८ मे २०२१ : -अभिनेता अक्षय वाघमारे बाबा झाला आहे. अक्षयची पत्नी योगिता गवळीने मुलीला जन्म दिला आहे. योगिता ही गँगस्टर अरूण गवळीची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत.

अक्षयने इन्स्टावर मुलगी झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. मला इतका आनंद झाला आहे की तो मी शब्दात मांडू शकत नाही. बाबा म्हणून मी माझा प्रवास सुरु करणार आहे आणि त्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. बाळ आणि योगिता दोघेही सुखरूप आहे, असं अक्षयने सांगितलं.

आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच या गोड बातमीने हा आनंद द्विगुणित झाला आहे. कुटुंबात नवीन सदस्य येणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आहे. इतकेच नव्हे तर बाळाचे नाव काय ठेवणार अशा प्रश्नांनी भंडावून सोडलं आहे, असंही अक्षयने म्हटले आहे.

दरम्यान, ​८ मे २०२० रोजी अक्षय व योगिता यांचा मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला होता. अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी 5 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप या मराठी चित्रपटांमध्ये केले आहे.

 

Previous articleसोलापूर जिल्ह्यात गाव तिथं कोविड सेंटर: दिलीप स्वामी यांची माहिती.             
Next articleशासकिय अनूदानाची रक्कम शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी संपुर्ण अदा करण्यात यावी — मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here