Home वाशिम अनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणा मुळे एका गायीचा व तिच्या...

अनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणा मुळे एका गायीचा व तिच्या बाळाचा मृत्यू

32
0

आशाताई बच्छाव

IMG_20231221_042412.jpg

अनसिंग येथील पशुवैद्यकीय रुग्णालय यांच्या निष्काळजी पणा मुळे एका गायीचा व तिच्या बाळाचा मृत्यू

रितेश गाडेकर युवा मराठा न्युज अनसिंग

पशुवैद्यकीय अधिकारी गैरहजर, दवाखाना सोडला वाऱ्यावर, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी सतत गैरहजर राहत असून मुख्यालयी राहत नसल्याने पशुपालकांना खाजगी वैद्यकीय डॉक्टर कडे जावे लागत आहे. स्थानिक पशुवैद्यकीय दवाखानातील पशुवैद्यकीय अधिकारी च्या दिवसा नी दिवस तक्रारी वाढत आहेत.पशुवैद्यकीय दवाखान्यात एक डॉक्टर व दोन दुसरे कर्मचारी असून ते सतत गैरहजर राहत असून मुख्यालयी सुधा राहत नसल्याने गावातील पशुपालकांना परत जावे लागत आहे.दवाखान्याची वेळ सकाळी सात ते बारा व दुपारी तीन ते सहा असून या वेळी डॉक्टर ची नियमित पणे गैरहजेरी असते.पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या गैरहजेरी मुळे अनेकदा वेळीच उपचार न मिळाल्यामुळे अनेक पशू दगावल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना हा असून नसल्यासारखा रोष पशुपालक तर्फे व्यक्त केल्या जात आहे.त्या मुळे निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थिती संदर्भात कोणाला विचारणा करावी हा प्रश्न पशुपालकांना निर्माण झाला आहे.तर अश्या बेजबाबदार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी.तसेच पशुपालकांना औषध उपचार अभावी नुकसान होणार नाही याची उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here