Home नांदेड मा श्री मधु गिरगांवकर यांच्या प्रयत्नाने बिलोली येथे एम.आय. डी. सी. मंजूर.

मा श्री मधु गिरगांवकर यांच्या प्रयत्नाने बिलोली येथे एम.आय. डी. सी. मंजूर.

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20231221_042948.jpg

मा श्री मधु गिरगांवकर यांच्या प्रयत्नाने बिलोली येथे एम.आय. डी. सी. मंजूर.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

आज दि 19 डिसेंबर2023 रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात
संपन्न झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या समितीच्या बैठकीत बिलोली येथे एम आय डी सी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ चे उद्योग )उभारणीस मंजूरी मिळाली आहे.
त्यामुळेबिलोली औद्योगिक विकास महामंडळ प्रकल्प ( MIDC ) उभारणीचामार्ग मोकळा झाला .
बैठकी पुर्वी मागास असलेल्या बिलोली तालुक्यातील MIDC चे महत्त्व पटवून देण्यात आले.मागील मागणीनुसार पाठपुरावा करून MIDC मंजुरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.यावेळी पाणी पुरवठा मंत्री यांचे माजी स्विय सहाय्यक मधु जी गिरगावकर यांचे सोबत माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार, लघुळ चे माजी सरपंच बाबुराव गोसलोड, भाजपचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजकुमार गादगे, भाजपा सोशल मीडिया जिल्हा संयोजक साईनाथ शिरोळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल मामडे यांची उपस्थिती होती.सदर कामात मोलाचे योगदान असलेल्या मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव मा श्री बालाजी पाटील खतगावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here