Home नांदेड शासकिय अनूदानाची रक्कम शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी संपुर्ण अदा करण्यात यावी — मा.आ.हणमंतराव पाटील...

शासकिय अनूदानाची रक्कम शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी संपुर्ण अदा करण्यात यावी — मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर

103
0

राजेंद्र पाटील राऊत

शासकिय अनूदानाची रक्कम शेतकर्‍यांना पेरणीपूर्वी संपुर्ण अदा करण्यात यावी
— मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नां.जि.म.स.बॅंकेचे नवनीर्वाचीत संचालक मा,आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या ऊपस्थीतीत बॅंकेचे कर्मचारी,गटसचीव यांची आढावा बैठक बॅंकेच्या सभागृहात पार पडली.
कर्मचार्‍यांच्या वतीने संचालक मा.आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकरांचा यथोचीत सत्कार करण्यात आला.
तत्पुर्वी साहेबांनी सर्व कर्मचार्‍यांशी संवाद साधला बॅंकेची सद्य परीस्थीती बाबत आढावा घेतला समस्या जाणुन घेतल्या.
सभेत मार्गदर्शन करतांना साहेबांनी
कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना सुचनाही केली.
शेतकरी बांधवासाठी या बॅंकेची निर्मिती झाली असून त्यांना कसल्याच प्रकारची अडचण येवू नये याची काळजी प्रत्येकांनी घ्यावी.
आता पेरणीचा हंगाम जवळ आलेला असुन
▪️शासनाचे वेगवेगळे अनुदान शेतकर्‍यांना ३१ मे पूर्वी अदा करण्याचे नियोजन करा.
कसल्याही परीस्थीतित विलंब होवू देवू नका,वेळ पडली तर एखादा तास जास्तीचे काम करा आपण सर्व तालूक्यातिलच शेतकर्‍यांचेच पुत्र आहोत.
आजच्या अडचणीच्या प्रसंगी आपणच पुढाकार घेवून आपल्या बांधवाना दीलासा देवू या.
पिकविम्याचे असो अथवा पिककर्जाचे असो शेतकर्‍यांना कसलिच अडचण नको.
त्यांच्याकडून शे पाचशे रू.कोणी घेत आहेत अशा तक्रारी माझ्याकडे येत आहेत
संबधीतानी असली नाडणूक करु नये.माझ्या कडे तक्रार आल्यास गय होणार नाही आधी कारवाई नंतर चौकशी होईल.तरी याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
ज्या शाखेचे अनुदान वाटप पुर्ण झाले आहे त्या शाखांनी लगतच्या शाखेतील अपूर्ण राहीलेले शैतकर्‍यांच्या सोयीच्या गांवाचे ही वाटप हाती घ्यावे व ते पूर्ण करावे.
आंम्ही मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातुन शेतकर्‍यांना शासनातर्फे वाढीव मदत मीळावी.
बॅंकेच्या विकासासाठी आवशक ते सहकार्य मिळावे यासाठी पाठपुरावा करीत आहोत.
▪️चव्हाणसाहेबांचे नवनिर्वाचीत कार्यकारी मंडाळाकडे बॅंकेला बी प्लस वरुन अ दर्जा मिळवून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

आमचा ही प्रयत्न बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा असुन सर्वांनी जोमाने काम करावे तुमचे ही प्रश्न आहेत अपुरा स्टाफ आहे ईतर ही प्रश्न आहेत ते ही प्राधान्याने सोडविण्याचा शब्द मी देतो
पण माझ्या शेतकरी बांधवाची अडचण करु नका.
विविध पतस्ंस्था कार्यरत आहेत त्यांना ही आवशक ते सहकार्य करा त्यांचे ही प्रतिनीधीत्व जिल्हा बॅंकेत आहेत.
पुढे बोलतांना मुखेड येथील पुर्विचे संचालक बॅंकेकडे कुणीही पहात नव्हते म्हणुनच शेतकर्‍यांची हेळसांड होत होती.
▪️आता नवे संचालक मंडळ सदैव शेतकर्‍यांसाठी ऊपलब्ध असेल
.मी स्वतः बॅंकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहे.
यापुढे दर तीमाही आढावा बैठक घेण्यात येइल
तालूक्यातील स्थानीक मागणी नुसार विभागवार म्हंजे सर्कल वाइज घेण्यात येईल
मुखेड येथील तालूका मुख्य शाखेत छत्तीस गांवचा भार आहे.
बॅंकेची स्वतःची प्रशस्त भव्य अशी आणि मध्यवर्ती मोंढ्याता इमारत आहे
तिथे शेतकरी बांधवाचे संपर्क कार्यालय सूरु करण्यात येइल पर्यायाने शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधने सोयीचे होइल.

लोकांना बँक आपली वाटली पाहीजे अधिकार्‍यांनाही काम करण्यासाठी ऊत्साह वाटला पाहीजे.
आमचा तालूक्यातील शेतकरी बांधवाना हक्काचा संचालक मिळालाय आमचीही जबाबदारी वाढलीय जनतेने ज्या विश्वासाने ही जबाबदारी दीलीय तो विश्वास सार्ध ठरविण्याचाच आमचा संकल्प असून यापुढे शैतकरी बांधवांना त्यांचे आर्थीक व्यवहारात कसलीच अडचण येणार नाही बॅंकेच्या कामकाजात सुधारणा दीसून येइल याची मी शाश्वती देतो.असे प्रतिपादन बॅंकेचे संचालक व मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी व्यक्त केले.
या बैठकीस तालूक्याचे जेष्ठ नेते नामदेव पाटील जाहूरकर,जि.प.सदस्य प्रतिनीधी संतोष बोनलेवाड.जिल्हा प्रवक्ते दिलीप कोडगिरे,फेडरेशनचे संचालक सावरगांवचे सरपंच शौकतखान पठाण,नागनाथ पाटील बेळीकर,गणेश पाटील बेळिकर,शंकर पा.जांबळीकर,सूरेश पाटील बेळीकर,जयप्रकाश कानगूले,मारोती घाटे,विशाल गायकवाड,रामेश्वर पा.इंगोले,व्यवस्थापक ताटे,अशोक रावणगांवकर,नागरगोजे,महाजन,संजय टोंपे व प्रमुख कर्मचारी,गटसचीव ऊपस्थीत होते.

Previous articleडॅडी अरूण गवळी झाला आजोबा; गवळी-वाघमारे कुटुंबात नव्या पाहुणीचं आगमन     
Next articleपदोन्नतीतील 33% आरक्षण रद्द           
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here