Home Breaking News 🛑 *पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक….! अपघातात 4 जण ठार* 🛑

🛑 *पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक….! अपघातात 4 जण ठार* 🛑

163
0

🛑 *पुण्यात पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक….! अपघातात 4 जण ठार* 🛑
✍️ जुन्नर 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

जुन्नर/पुणे :⭕ गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशात पुण्यातील जुन्नरमध्ये भीषण अपघातात 4 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.

कल्याण-नगर महामार्गावर वडगाव आनंद इथे पिकअप आणि टेम्पोची भीषण धडक झाली. या अपघात इतका मोठा होता की, यामध्ये 4 जण जणांचा जीव गेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दांगटमळ्याजवळ आज पहाटे टाटाच्या जितो आणि आयशर ट्रकमध्ये सामोरा-समोर धडक झाली. यासंबंधीची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.

अपघातात टाटा कंपनीच्या जितो या 3 चाकीचं मोठं नुकसान झालं आहे. सदरची जितो टेम्पो क्रमांक MH 16 CC 6388 मुंबईकडून आळेफाटा बाजूस येत होता तर आयशर टेम्पो MH 16 AE 9080 आळेफाटा बाजुकडून कल्याण दिशेने चालला होता. मृतांमधील 4 जण जितोमधील असून दोघांचा घटनास्थळी जागीच मृत्यु झाला आहे तर एकाचा आळेफाटा इथल्या रुग्णालयात तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.मृतांमधे जितोच्या चालक व वाहकासह अन्य दोघांचा समावेश आहे. तर आयशरचा चालक किरकोळ जखमी झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

अपघातानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी 4 मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मृतांची माहिती देण्यात आली असून चारही कुटुंबावर शोककळा पसरली आहे…..⭕

Previous article🛑 देऊळ बंद ; पण मुंबईच्या सिद्धीविनायकाचं ”इथं” घेता येणार दर्शन; हे अँप करा डाऊनलोड 🛑
Next article🛑 *बाणेरच्या कोविड सेंटरचे लोकार्पण !* 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here