• Home
  • 🛑 देऊळ बंद ; पण मुंबईच्या सिद्धीविनायकाचं ”इथं” घेता येणार दर्शन; हे अँप करा डाऊनलोड 🛑

🛑 देऊळ बंद ; पण मुंबईच्या सिद्धीविनायकाचं ”इथं” घेता येणार दर्शन; हे अँप करा डाऊनलोड 🛑

🛑 देऊळ बंद ; पण मुंबईच्या सिद्धीविनायकाचं ”इथं” घेता येणार दर्शन; हे अँप करा डाऊनलोड 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 29 ऑगस्ट : ⭕ मुंबईतील प्रभादेवी परिसरात असणाऱ्या सिद्धीविनायक गणपतीचं आता भाविकांना घरबसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. ‘सिद्धीविनायक टेंपल’ या मोबाईल ॲपचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

कोरोना काळात मंदिरे बंद असल्याने भाविकांना बाप्पाचे दर्शन घेता येत नव्हते. भाविकांच्या सोईसाठी न्यासातर्फे ही विशेष सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ‘सिद्धीविनायक टेंपल’ या नावाने असणारे हे ॲप अँड्राईड आणि ॲपलवरुन डाऊनलोड करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून भाविकांना ऑनलाईन दर्शनाची वेळ बुक करता येणार आहे.

या बुक केलेल्या वेळी भाविकांच्या नावे मंदिराचे पुजारी थेट गाभाऱ्यातून आशिर्वचन करतील. तसेच ॲपद्वारे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार असून मंदिरातील विविध सण- उत्सवांची अद्यायावत माहिती उपलब्ध होणार आहे. चाफ्याची कंठी आणि विलोभनीय असं गणरायाचं रुप आता अॅपच्या माध्यमातून सगळ्यांना पाहता येणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment