• Home
  • 🛑 नीट, जेईई परीक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका 🛑

🛑 नीट, जेईई परीक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका 🛑

🛑 नीट, जेईई परीक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका 🛑

मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 29 ऑगस्ट : ⭕ जेईई मेन आणि नीट परीक्षांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांनी आव्हान दिलं आहे. या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रासह प. बंगाल, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या काँग्रेसशासित तसेच बिगरभाजप राज्यांनी ही याचिका दाखल केली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर नीट, जेईई मेन परीक्षा घेण्याच्या निर्णयाचा न्यायालयाने पुनर्विचार करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑगस्टला निर्णय देत नीट-जेईई परीक्षा स्थगित करण्याची मागणी फेटाळून लावली होती. या निकालानंतरही देशात विद्यार्थी-पालकांकडून या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या पार्श्वभूमीवर काँग्रेसशासित प्रदेशातील तसेच बिगर भाजप राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनंतर या राज्यांनी हे पाऊल उचलले आहे. करोनाच्या संकटामुळे अनेक राज्यांमध्ये जेईई व नीट परीक्षा घेणे शक्य नसून त्या पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एकत्रितपणे फेरविचार याचिका करावी, अशी सूचना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या बैठकीत मांडली होती. सर्व बिगरभाजप मुख्यमंत्र्यांना केली होती. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सहभागी झाले होते.

जेईई मेन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर तर नीट परीक्षा ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, देशातील १७ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीट परीक्षांचे प्रवेश पत्र डाऊनलोड केले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा व्हायला हवी आहे, हेच यातून स्पष्ट होते, असे विधान केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मेडिकल, इंजिनीअरिंगची प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोखरियाल यांनी हे विधान केले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment