• Home
  • 🛑 आकर्षक चॉकलेट केक पॉप्स 🛑

🛑 आकर्षक चॉकलेट केक पॉप्स 🛑

🛑 आकर्षक चॉकलेट केक पॉप्स 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

✍️ पाककला रेसिपी

मुंबई, 29 ऑगस्ट : ⭕

➡️ महत्त्वाची सामग्री :-

(Serving: 2)

– आवश्यकतेनुसार चॉकलेट स्पंज
– 1.5 कप वितळलेले डार्क चॉकलेट
– 3 चमचे व्हीप्ड क्रीम
– 2 pieces मॅश केलेले होलव्हिट बिस्किटे
– आवश्यकतेनुसार चॉकलेट चिप्स
– आवश्यकतेनुसार कलरफुल स्प्रिंकल्स
– आवश्यकतेनुसार ब्रेड स्टिक्स

➡️ कसे बनवावे आकर्षक चॉकलेट केक पॉप्स :-

Step 1: चॉकलेट केक पॉप्ससाठी पीठ मळण्याची प्रक्रिया
मऊ मऊ चॉकलेट केकचा चुरा करा. या चु-यात फेटलेली क्रिम आणि बिस्किटांचा चुरा घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन त्याचा गोळा बनवा. जर मिश्रण कोरडं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडी फेटलेली क्रिम घालू शकता जेणे करुन मिश्रणाचा नरम गोळा तयार होईल.

Step 2: चॉकलेटचे गोळे लॉलीपॉपसारखे स्टिकवर लावा
पीठाचे छोटे छोटे गोळे बनवा आणि २ ते ३ मिनिटांसाठी ते बाजूला ठेवा. आता लॉलीपॉप स्टिक घ्या आणि ते वितळवलेल्या चॉकलेटमध्ये बुडवा आणि लॉलीपॉपच्या स्वरुपात केकच्या गोळ्यांवर लावा.

Step 3: चॉकलेट केक पॉप्स फ्रिजमध्ये ठेऊन सेट करा
आता हे लॉलीपॉप १ तास फ्रिजमध्ये ठेवा आणि व्यवस्थित सेट करा.

Step 4: केक पॉप्स अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यावर स्प्रिंक्लर्स भुरभूरा
आता केक पॉप्स फ्रिजमधून बाहेर काढा आणि वितळवलेल्या चॉकलेटमध्ये बुडवा. त्यावर स्प्रिंक्लर्स भुरभूरा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला किंवा एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीत लहान मुलांना हे चॉकलेट केक पॉप्सचं सरप्राईज देऊन खुश करा.

Step 5: तयार झालेत यम्मी यम्मी चॉकलेट केक पॉप्स
लहान मुलांचे विशेष आकर्षण केक पॉप्स! ⭕

anews Banner

Leave A Comment