• Home
  • 🛑 *बाणेरच्या कोविड सेंटरचे लोकार्पण !* 🛑

🛑 *बाणेरच्या कोविड सेंटरचे लोकार्पण !* 🛑

🛑 *बाणेरच्या कोविड सेंटरचे लोकार्पण !* 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

बाणेर/पुणे :⭕ पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आणि विविध संस्थांच्या सहकार्याने साकारलेल्या कोविड रुग्णालयाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार आणि मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. लोकार्पण केल्यानंतर संपूर्ण कोविड सेंटरची पाहणी करुन आढावा घेतला.

जम्बो सेंटरनंतर सुरु केलेल्या या सेंटरचा मोठा फायदा आपल्याला मिळणार असून आता बेड मिळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा पाटील, खासदार गिरीश बापट, आ. माधुरीताई मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सौ. मुक्ताताई टिळक, आ. सिद्धार्थ शिरोळे, आ. सुनील कांबळे, उपमहापौर सौ. सरस्वतीताई शेंडगे, भाजप शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक स्थायीचे अध्यक्ष श्री. हेमंत रासने, विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, शिवसेनेचे गटनेते श्री. पृथ्वीराज सुतार, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर, सौ. ज्योती कळमकर, सुशील मेंगडे, दिलीप वेडे-पाटील, शहर भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवडचे महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते.

‘अतिशय चांगले रुग्णालय उभारल्याबद्दल मी पुणे महानगरपालिकेला प्रथम शुभेच्छा देतो.

ज्यांनी या कामासाठी मदत केली त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो. खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केली गेली असून पुणे महानगरपालिकेने जास्तीत जास्त तपासण्या करुन कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, अशी भूमिका यावेळी मा. देवेंद्रजींनी मांडली.

यावेळी विविध संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करुन पुणेकरांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त केले. यात सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी सी.एस.आर. माध्यमातून रक्कम रु. ५ कोटी ५० लाख रुपये इतका खर्च झालेला आहे. पंचशील फाउंडेशन, ABIL फाउंडेशन, माईंडस्पेस बिझनेस पार्क प्रा.लि. मालपाणी ग्रुप संगमनेर गेरा डेव्हलपमेंट प्रा.लि. सोभा लिमिटेड, झाला आणि कोदरे असोशीएटस्, जे. अन्ड जे. असोशीएटस् व न्यू फार्मा प्रा.लि. या एजन्सीयांनी मदत केलेली आहे.

या सर्व सुविधामुळे रुग्णांना विना अडथळा व पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होईल तसेच वैदकीय सुविधा रुग्णांना मोफत स्वरुपात उपलब्ध होणार आहे. शिवाय आर्ट ऑफ लिव्हिंगचे IAHV या संस्थेने या सेंटरच्या उभारणीत मोलाची मदत केली.

तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आणि संपूर्ण टीमने विशेष लक्ष देऊन हे कोविड सेंटर साकारण्यात विशेष मेहतन घेतली, त्याबद्दल पुणेकरांच्या वतीनं सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद !……⭕

anews Banner

Leave A Comment