Home भंडारा खासदार सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात होणार सांगता

खासदार सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात होणार सांगता

34
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20231006-WA0075.jpg

 

खासदार सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात होणार सांगता

7 व 8 ऑक्टोबरला साकोलीत समारोपीय सोहळा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र   संजीव भांबोरे भंडारा (जिल्हा प्रतिनिधी): )केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून आणि खासदार सुनिल मेंढे संकल्पनेतून साकारलेल्या वैनगंगा पांगोली खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा सांगता समारोह 7 व 8 ऑक्टोबर रोजी साकोली येथील परेड ग्राउंड येथे होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारोपीय कार्यक्रमाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण भागातील सांस्कृतिक वारसा जपला जावा, प्रतिभावंत कलाकारांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, या उदात्त हेतूने केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात हा सांस्कृतिक महोत्सव राबविला. महोत्सवा दरम्यान भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी युवक, युवती आणि महिलांचे समूह नृत्य स्पर्धा घेतल्या गेल्या. परंपरागत आदिवासी नृत्य प्रकाराचा समावेश या महोत्सवात करण्यात आला होता. महिला, युवक आणि युवती अशा तीनही गटात तालुकास्तरावर विजेत्या समूहांना आकर्षक बक्षीस देण्यात आले होते. जवळपास 5700 च्या आसपास स्पर्धक कलाकारांनी या महोत्सवात आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. सोबतच 25 हजाराहून अधिक प्रेक्षकांनी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा आनंद लुटला होता.
प्रत्येक तालुक्यातील विजेत्या समूहांना लोकसभा स्तरावर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याच्या दृष्टीने लोकसभा स्तरीय कार्यक्रम आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा समारोपीय सोहळा 7 व 8 ऑक्टोबर रोजी साकोली येथील होमगार्ड परेड मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक असे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी 2 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अन्य मान्यवर उपस्थित राहतील. तर समारोपाला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ उपस्थित राहणार आहेत. दोन्ही दिवस ब्रिटन गॉट चॅलेंज 2020 चा विजयी समूह x1x आकर्षक अशा नृत्य अविष्काराचे सादरीकरण करणार आहे. दोन्ही दिवस लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यातून विजयी होत लोकसभा स्तरावर दाखल झालेल्या 108 समूहांचे आकर्षक नृत्याविष्काराचा आस्वादही घेता येणार आहे. नागरिकांनी आणि नृत्य प्रेमींनी दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावावी, असे आवाहन खा.सुनील मेंढे यांनी केले आहे.
….

Previous articleश्रीरामपूर शहरातील भाग क्र. ४ चे नगरसेवक हे असे आहेत की २४ तास भागातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावून जातात.
Next articleबस आगारप्रमुख साकोली यांना विध्यार्थ्यांच्या समस्यांचे निवेदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here