Home भंडारा लोहगड येथे माघ पौर्णिमा उत्सव निमित्त महाबोधी महाविहार प्रतिकृती जागेचे भूमिपूजन, बुद्धगया...

लोहगड येथे माघ पौर्णिमा उत्सव निमित्त महाबोधी महाविहार प्रतिकृती जागेचे भूमिपूजन, बुद्धगया येथून आणलेल्या वृक्षाचे वृक्षारोपण , धम्महॉल उद्घाटन, तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रम संपन्न

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_074451.jpg

लोहगड येथे माघ पौर्णिमा उत्सव निमित्त महाबोधी महाविहार प्रतिकृती जागेचे भूमिपूजन, बुद्धगया येथून आणलेल्या वृक्षाचे वृक्षारोपण , धम्महॉल उद्घाटन, तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रम संपन्न

नागपूर (संजीव भांबोरे) कळमेश्वर तालुक्यातील लोहगड येथे आज दिनांक 25 फरवरी 2024 ला माघ पौर्णिमा उत्सव महाबोधी महाविहार प्रतिकृती जागेचे भूमिपूजन, बुद्धगया येथून आणलेल्या बोधी वृक्षाचे वृक्षारोपण, धम्महॉल चे उद्घाटन ,तथागत सम्यक संबुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण कार्यक्रम संपन्न झाला .भूमिपूजन सोहळा आमदार सुनील भाऊ केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते पार पडला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंते प्रशिल रत्न गौतम अध्यक्ष संघकारा फाउंडेशन हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून भंते प्रियदर्शी महाथेरो नागपूर , भंते सत्यानंद महाथेरो अमरावती, भंते अभय नाईक नागपूर ,उपासिका सुलेखाताई कुंभारे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, मुक्ताताई कोकर्डे अध्यक्ष नागपूर जिल्हा परिषद , कुंदाताई राऊत उपाध्यक्ष नागपूर जिल्हा परिषद , बाबाराव पाटील अध्यक्ष बाजार समिती कळमेश्वर ,मनोहर कुंभारे माजी उपाध्यक्ष नागपूर जिल्हा परिषद, सिद्धार्थ गायकवाड आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर ,ई. झेड .खोब्रागडे माजी सनदी अधिकारी ,डॉ सुशांत मेश्राम विभाग प्रमुख गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर ,डॉ.खजान सिंह भास्कर निवृत्त प्रिन्सिपल सायन्स, योजनाताई ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या मुंबई, मोनाली टेकाडे सरपंच लोहगड ,राजेश बुरबुरे सुप्रसिद्ध गायक, यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे आयोजन धम्मरक्षित जीवनबबोधी बौद्ध (मेश्राम) जीवनबोधी बौद्ध ,सुरेंद्रसिंग बुंदेले यांनी केले होते.

Previous articleविद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून उज्ज्वल यश संपादन केले पाहिजे
Next articleसंत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 2024 नविन नियुक्ती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here