Home नाशिक संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 2024 नविन नियुक्ती

संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 2024 नविन नियुक्ती

23
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_074802.jpg

नाशिक,(अँड विनया नागरे प्रतिनिधी)

संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 2024 नविन नियुक्ती महिला कार्यकारी यांनी
बालाजी कोट नाशिक येथे लहान मुलांचे व महिलांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमांमध्ये मुलांच्या तीन गटांमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले तसेच छोट्या मुलांसाठी देखील फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन व श्लोक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यात सर्व वयोगटातील मुलांना भाग घेतला होता.महीलासाठी फॅन्सी ड्रेस तसेच राम फोन घेण्यात आला व मॅचिंग या स्पर्धा घेण्यात आल्या, सदर कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन महिला कार्यकारी यांनी केलेले होते. सो मंजुषा कोलते अध्यक्ष, सौ.प्रियांका शहाणे उपाध्यक्षा, सौ.सविता शहाणे, उपाध्यक्षा,सौ जाई नागरे, उपाध्यक्षा सौ.दर्शनी आंबेकर, उपाध्यक्षा सौ संगीता उदावंत, उपाध्यक्षा सौ. पूजा नागरे, सेक्रेटरी, सौ. विनया नागरे सह सेक्रेटरी तसेच सौ. नमिता आडगावकर खजिनदार, सौ रेखा शहाणे सहखजिनदार, सौ.हेमा लोळगे, सौ.वंदना माळवे,सौ. वैशाली जवळकर, सौ.ज्योती काजळे,सौ श्रद्धा नागरे, सौ.गौरी दहिवळकर, सौ.अंकिता काजळे, सौ.श्वेता उदावंत, सौ.सोनम कपिले, सौ.जान्हवी मंडलिक सदस्य या सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य व प्रयत्न केले. चित्रसृष्टी आर्ट अकॅडमी च्या सौ. चित्रा मालवी व सिद्धेश मालवी यांनी पूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले होते. माधवीचा यांनी खूप छान प्रकारे सूत्रसंचालन केले, तसेच सर्व महिलांचे व मुलांचे मनोरंजनात्मक विविध खेळ व डान्स डान्स करून कार्यक्रमामध्ये आपल्या कलागुणांना वाव दिलेला आहे.छान असा जेवणाचा आस्वाद घेऊन झाल्यावर लगेच सर्व स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here