Home बीड बीडच्या शासकीय रुग्णालयात उभारले जाणार स्वतंत्र आय सी यू ; प्रधानमंत्री नरेंद्र...

बीडच्या शासकीय रुग्णालयात उभारले जाणार स्वतंत्र आय सी यू ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ऑनलाइन भूमिपूजन

21
0

आशाताई बच्छाव

IMG_20240226_075132.jpg

बीडच्या शासकीय रुग्णालयात उभारले जाणार स्वतंत्र आय सी यू ; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ऑनलाइन भूमिपूजन

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड दि:२५  रोजी येथील जिल्हा रुग्णालयात आणखीन एक ५० खाटांचे स्वतंत्र आय सी यू उभारले जाणार असून व्हेंटिलेटर, ऑक्सिजनसह इतर सुसज्ज अशी यंत्रणा या नव्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपलब्ध असणार आहे. पीएम- अभिम मधून मंजूर झालेल्या या रुग्णालयाचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आज सायंकाळी ०४ वाजता पार पडले असल्याची माहिती सीएस डॉ.अशोक बडे यांनी दिली आहे. बीड जिल्हा रुग्णालय सध्या ३०० खाटांची क्षमता आहे. मात्र अंतर रुग्णांची संख्या रोज ५०० च्या घरात असते. त्यामुळे मागच्या काही वर्षापासून २०० खाटांचे नवे रुग्णालय मंजूर झाले आहे. त्याचे बांधकाम सध्या जिल्हा रुग्णालयाच्या पूर्वेकडील जागेत सुरू आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान मधून १०० खाटांचे माता व बालसंगोपन रुग्णालयाची इमारत बांधून पूर्ण आहे. फायर, ऑक्सिजन, लाईट, लिफ्ट आदी कामे अपूर्ण असल्याने सध्या इमारत पडून आहे. अशातच पीएम – अभिम मधून जिल्हा रुग्णालयात नवीन स्वतंत्र आयसीयूच्या उभारल्या जाणाऱ्या इमारतीसाठी २५ कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केले आहे. आज रविवार (दि: २५) नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजनचा सोहळा पार पडला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडवीय, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आदींची मुंबईतून ऑनलाईन उपस्थिती होती आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हा रुग्णालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बडे यांनी दिली.

Previous articleसंत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त 2024 नविन नियुक्ती
Next articleजिजाई इंग्लिश स्कूल सेंटरवर १४२ विध्यार्थी दिले (आय.ए.एस.) श्रेयाची परीक्षा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here