Home Breaking News ग्रामपंचायत गट घोट व ३ गावातील जनतेला होणार नळाद्वारे पाणीपुरवठा आमदार डॉ...

ग्रामपंचायत गट घोट व ३ गावातील जनतेला होणार नळाद्वारे पाणीपुरवठा आमदार डॉ देवरावजी होळी

89
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220808-WA0025.jpg

ग्रामपंचायत गट घोट व ३ गावातील जनतेला होणार नळाद्वारे पाणीपुरवठा

आमदार डॉ देवरावजी होळी

गडचिरोली – ( सुरज गुंडमवार ब्युरो चिफ युवा मराठा  न्युज 

ग्रामपंचायत गट घोट व ३ गावे या नळाद्वारे पाणीपुरवठा योजनेचे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे हस्ते भूमिपूजन

आमदार डॉ देवरावजी होळी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नामदेवरावजी सोनटक्के यांच्या प्रयत्नांना अखेर यश

जिल्हा परिषद शाळा घोट व अंगणवाडी घोट येथे भेट देऊन केली परिसराची पाहणी

दिनांक ८/८/२०२२ गडचिरोली

आमदार डॉ देवरावजी होळी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नामदेवराव जी सोनटक्के यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत गट घोट व ३ गावे हे पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. आता ही योजना लवकरच सुरु होणार असल्याने नागरिकांना लवकरच नळाद्वारे पाणीपुरवठा होणार असून नागरिकांची मागील अनेक दिवसांची मागणी आता प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद आपल्याला होत असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नामदेवरावजी सोनटक्के तालुक्याचे महामंत्री साईनाथजी बुरांडे ग्रामपंचायतिचे सन्माननीय सरपंच व सदस्य ,पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते,

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत ग्रामपंचायत गट घोट व ३ गावे या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना आमदार यांनी कामाच्या दर्जा चांगला ठेवून लोकांना उत्तम सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून शेजार योजनेचे काम पूर्ण करावे असे निर्देश दिले

याप्रसंगी आमदार महोदयांनी जिल्हा परिषद शाळा घोट व अंगणवाडी केंद्र घोट येथे भेट देऊन येथील परिसराची पाहणी केली व आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही दिलेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here