Home Breaking News लेखा बूथ सशक्तीकरण अभियानाचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला शुभारंभ लेखा...

लेखा बूथ सशक्तीकरण अभियानाचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला शुभारंभ लेखा ग्रामपंचायतीला महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची फोटो दिली भेट

48
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220808-WA0024.jpg

लेखा बूथ सशक्तीकरण अभियानाचा आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला शुभारंभ

गडचिरोली – ( सुरज गुंडमवार ब्युरो चिफ युवा मराठा  न्युज 

लेखा ग्रामपंचायतीला महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांची फोटो दिली भेट

केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना बद्दलही दिली माहिती

आमदार महोदयांना पार्टीच्या वतीने बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत धानोरा तालुक्यातील लेखा हे बूथ देण्यात आल्याची माहिती

 

भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत लेखा या बूथाच्या सक्षमीकरण अभियानाची आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सुरवात केली.

यावेळी त्यांनी नुकत्याच राष्ट्रपतीपदी विराजमान झालेल्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी जी मुरूमू यांचा फोटो ग्रामपंचायतीच्या कार्याला भेट म्हणून सरपंच यांच्याकडे सुपूर्द केला

भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने विधानसभा क्षेत्रातील काही अशक्त बुथाना सशक्त करण्याचे अभियान हाती घेण्यात आले असून त्या अंतर्गत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना धानोरा तालुक्यातील लेखा हे बूथ देण्यात आले आहे. त्यानुसार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या बुथाला भेट दिली. या सशक्तीकरण अभियानांतर्गत असलेली माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली

यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जलकल्याणाच्या योजना जनतेसमोर मांडल्या. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतिने पुढाकार घ्यावा व गावातील लोकांनाही त्या योजनांबद्दल माहिती द्यावी व त्यातून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवून द्यावा असेही त्यांनी या भेटीच्या प्रसंगी उपस्थित ग्रामपंचायतीच्या नेत्यांना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here