Home Breaking News वाघाच्या हल्ल्यात मृत्त पावलेल्या परिवाराचे सांत्वन व आर्थिक मदत खा.अशोकजी नेते

वाघाच्या हल्ल्यात मृत्त पावलेल्या परिवाराचे सांत्वन व आर्थिक मदत खा.अशोकजी नेते

39
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220809-WA0008.jpg

वाघाच्या हल्ल्यात मृत्त पावलेल्या परिवाराचे सांत्वन व आर्थिक मदत

खा.अशोकजी नेते

गडचिरोली – ( सुरज गुंडमवार ब्युरो चिफ युवा मराठा  न्युज 

गडचिरोली जिल्ह्यातील बोदली येथील घटना.

गडचिरोली (बोदली) :बोदली येथील गुराखी मारोती निंबाजी पिपरे हे शेत शिवारात गुरे चारत असतांना तिथेच अचानक दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक गुराखीवर हल्ला करून यात गुराखीचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना ६ ऑगस्ट २०२२ शनिवार ला सायंकाळी ६.०० वाजताच्या सुमारास घडली मारोती निंबाजी पिपरे (वय-६७) रा.बोदली असे मृतकाचे नाव आहे त्यांच्यामागे एक पत्नी व मुलगा असा आप्त परिवार आहे.
याबाबतची माहिती मिळताच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवारांला घरी जाऊन आर्थिक देऊन परीवारांचे सांत्वन केले.
याप्रसंगी खा.अशोकजी नेते
आकाश गजानन निकोडे सरपंच ग्रा.पं.बोदली तथा युवा मोर्चाभाजपाचे तालुका अध्यक्ष गडचिरोली नितीन कुनघाडकर -बोदली सदाशिव मारोती पिपरे-मुलगा अनुसया मारोती पिपरे-पत्नी उपवनसंरक्षक शर्मा,भडके RFO, तसेच वनअधिकाऱी कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here