Home उतर महाराष्ट्र निर्भिड पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांवरील होणारे हल्ले न थांबल्यास राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ...

निर्भिड पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांवरील होणारे हल्ले न थांबल्यास राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पत्रकार न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार – संतोष निकम

109

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220512-WA0038.jpg

निर्भिड पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांवरील होणारे हल्ले न थांबल्यास राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पत्रकार न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरणार – संतोष निकम

वासखेडी/धुळे-दिपक जाधव – येथील शिर्डीत राष्ट्रीय ,विश्वगामी पत्रकार संघ आयोजीत राज्यस्तरीय पत्रकार मेळावा चे आयोजन शिर्डि येथील हाटेल साई गोल्ड इन येथे करण्यांत आला त्याप्रसंगी मेळाव्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा,संतोषजी निकम,कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना म्हणाले की,निर्भिड पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांवरील होणारे हल्ले न थांबल्यास ,राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सघ रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा
यावेळी त्यांनी दिला,राज्यातील निर्भिड पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांवर वाळू माफिया,खनिज माफिया,अवैद्य व्यावसायिक,भ्रष्ट अधिकारी,कर्मचारी,भ्रष्ट लोकप्रतिनिधीं व त्यांचे गावगुंड यांच्या कडुन पत्रकार व कुटुंबीयांनवरील ,अन्याय,हल्ले‌ याबाबत दाद मागण्यासाठी संबधीत पोलीस ‍स्टेशनमध्ये पिडीत पत्रकार गेल्यास अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी गुन्हेगारांशी सेटींग करून उलट पत्रकारांवर च खंडणीचे व इतर खोटे गुन्हे दाखल करून प्रकरण दडपण्याचा केविलवाणी प्रयत्नं करतात,राज्य शासनाने तसेच केन्द्र शासनाने पत्रकारांच्या सरंक्षणासाठी कायदे केले आहेत, मात्र त्यांची संबधित अधिकार्याकडुन अंमलबजावणी होत नसल्यामुळें हे कायदे कुचकामी ठरत आहेत,पत्रकारांच्या अनेक प्रलंबीत मागण्या पुर्ण केल्या जात नाही,याबाबत आवाज उठवण्यासाठी राज्यातील पत्रकारांनी पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणुन काम करणाऱ्यांनी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सघांत सामिल व्हावे असे आव्हान देखील निकम यांनी केले,
यावेळी मेळाव्याचे स्वागत अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार वसंतराव आटोटे,तर प्रमुख पाहुणे ,राष्ट्रीय सचिव रमेश देसाई,प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील,उपसचिव सोमनाथ मानकर,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रूपेश वराडे,महीला प्रदेश अध्यक्ष सौ,रेणुका पगारे,महीला प्रदेश सचिव अश्विनी भालेराव,संघटक प्रफुल्ल मेश्राम, विजय केदारे,विदर्भ अध्यक्ष पद्माकर घायवान,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुकुमार वांजोळे,पदाधिकारी, वरीष्ठ पत्रकार, संपादक, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी ते साठी अहमदनगर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम पवार,सिद्धार्थ मेहेरखांब,भाऊसाहेब भालेराव,रवि सरोदे,लक्ष्मण महाले,संतोष वाडेकर,योगेश बाराथे,धनराज राजपुत,आदीनी केले,यासह,नगर जिल्ह्यतील सर्व पत्रकार व समाजसेवकांनी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघात प्रवेश केला, व पदग्रहण सोहळा संपन्न करत ,प्रवेश केलेल्या पत्रकारांना ,संघटनेचे, निकम यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या,