Home Breaking News पिंगळवाडे येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहत साजरा

पिंगळवाडे येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहत साजरा

365
0

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे  आज शिवराज्यिषेक दिनानिमित्त पिंगळवाडे येथे ग्रामपंचायत कार्यालया मध्ये सरपंच सौ. लताबाई केदा भामरे यांच्या शुभहस्ते राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेचं पुजन करण्यात आला त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन ग्रामपंचायतीचे ऊपसरपंच श्री संजय चिंतामण भामरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी संपूर्ण गावात गुढ्या उभारल्या होत्या. इतर उपस्थित ग्रामस्थांनी शिवरायांच्या पुतळ्याला श्रीफळ, पुष्पमाला अर्पण करुन आपली शिवरायांच्या प्रती असलेली निस्सीम श्रद्धा व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत यांच गायन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केल. इतिहास हा अभ्यासापुरता नसावा अशा ऐतिहासिक सोहळ्याच्या माध्यामातनं येणाऱ्या पिढ्यांना त्याचं महत्त्व, स्मरण झाले पाहिजे. छत्रपतींच्या कर्त्रुत्वाचा, आदर्शाचा पाठ नवीन पिढीसमोर म्हटला पाहिजे तेंव्हाच हा इतिहास पुरुष, धर्मरक्षक, जाणता राजा सर्वांना प्रेरणादायी स्मरणात राहतील. कार्यक्रम प्रसंगी पिंगळवाडे विविध का. सोसायटीचे चेअरमन श्री केदा दावल भामरे त्याचप्रमाणे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कृष्णा धर्मा भामरेआणि पिंगळवाडे गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ , यांनी शासन नियमांचे पालन करत सामुदायिक पणे छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करून सर्वांना शिवराज्याभिषेक सोहळा निमित शुभेच्छा दिल्या. शासनाच्या नियमांचे उल्लंघन न करता शिस्तबद्ध, तोंडाला मास्क चा वापर, व सामाजिक अंतर यांचे काटेकोर पणें पालन करा हा ऐतहासिक सोहळा साजरा केला.
ग्रापंचायत सदस्य अरुण रामदास बागुल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here