Home Breaking News सुटातर्फे जि.प.आरोग्य विभागास 50 ऑक्सिजन फ्लोमीटरर्स प्रदान

सुटातर्फे जि.प.आरोग्य विभागास 50 ऑक्सिजन फ्लोमीटरर्स प्रदान

98
0

सुटातर्फे जि.प.आरोग्य विभागास 50 ऑक्सिजन फ्लोमीटरर्स प्रदान

कोल्हापूर: ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची वाढती संख्या तसेच रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनच्या सिलेंडचा भेडसावणारा प्रश्न पाहून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिक्षक संघाच्या ( सुटा ) वतीने आज जिल्हा परिषदेला 5O ऑक्सिजन फ्लो मीटरर्स प्रदान करण्यात आले.
सुटाने येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून मानवतेच्या भावनेतून तातडीने पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन सुमारे दीड लाख रुपये किमतीची 50 ऑक्सीजन फ्लो मीटरर्स खरेदी करून जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार सदर उपकरणे कोल्हापूरमध्ये उपलब्ध नसल्याने दिल्लीवरुन मागविण्यात आली. ही उपकरणे ग्रामीण भागात देण्यात येणार आहेत. सदरील उपकरणे जि.प.चे आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, प्र . जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमतीडॉ. यु. जी. कुंभार , माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील, सुटाचे कार्यवाह ( कोल्हापूर ) डॉ. डी. आर. भोसले, कार्यकारणी सदस्य प्रा. सयाजी पाटील व प्रा. सुनीता अमृतसागर उपस्थित होते. याकामी सुटाचे प्रमुख समन्वयक प्रा. एस. जी. पाटील, प्रा. सुधाकर मानकर, प्रा टी. व्ही. स्वामी, प्रा. ए. पी. देसाई यांचे मार्गदर्शन तर डॉ.आर. के. चव्हाण, डॉ अरुण पाटील, डॉ. गजानन चव्हाण, डॉ.अरुण शिंदे, डॉ. यु ए. वाघमारे यांचे सहकार्य लाभले.

Previous articleपिंगळवाडे येथे शिवराज्यभिषेक दिन उत्साहत साजरा
Next articleपर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here