Home सामाजिक डिलिव्हरी बॉय

डिलिव्हरी बॉय

143
0

आशाताई बच्छाव

IMG_20240305_203523.jpg

डिलिव्हरी बॉय

डिलिव्हरी बॉय अर्थात एखादे असे काम जिथे ती व्यक्ती प्रत्यक्ष जाऊन प्रोडक्ट डिलिव्हर करत असते.अशा अनेक कंपन्या आपल्या कंपनीत डिलिव्हरी बॉय ठेवून त्यांना ग्राहकांपर्यंत घरपोच सामान,फुड प्रोडक्ट्स असे विविध प्रोडक्ट्स लोकांना घरपोच पोहचविण्यासाठी ठेवत असतात.त्यासाठी त्यांना कंपनीकडून पगार मिळत असतो.डिलिव्हरी बाॅय होण्यासाठी ज्या कंपन्यांना डिलिव्हरी बॉयची गरज असते अशा ठिकाणी अर्ज भरावा लागतो.कंपनीत जर जागा रिकामी असेल तर तेथे डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी मिळू शकते.डिलिव्हरी बाॅय होण्यासाठी खूप कंपन्या आहेत जिथे त्यांना चांगली कमाई होऊ शकते.उदाहरण द्यायचे झाले तर फूड डिलिव्हरी कंपनी, मेडिकल फार्मसी कंपनी, कुरियर कंपनी इत्यादी. डिलिव्हरी बॉय होण्यासाठी काही किमान पात्रता असावी लागते.जसे की तुमचे वय अठरा वर्षे तरी असावे, कमीतकमी दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.ब-या प्रमाणात इंग्रजी देखील येणं आवश्यक आहे.तुमच्याकडे स्वतःचे वाहन असावे.तुमचे बॅंक अकाउंट असणे गरजेचे आहे.हा एक पार्टटाईम जाॅब म्हणून सुध्दा अनेकजण करतात.एक महत्वाची गोष्ट म्हणजे या नोकरीत काही कंपन्या पगारा व्यतिरिक्त बाईकचा पेट्रोल खर्च सुद्धा डिलिव्हरी बॉयला देतात. डिलिव्हरी बॉयचा पगार सर्व कंपन्यांमध्ये वेगवेगळा असतो.चांगल्या प्रख्यात कंपनीचा डिलिव्हरी बॉय झाल्यास दरमहा चांगले इंकम मिळू शकते.काही कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉयला मंथली बेसिसवर पगार मिळतो.म्हणजे त्यांचा एक पगार ठरलेला असतो.काही कंपन्या मात्र डिलिव्हरी बॉयला प्रोडक्ट बेसिसवर पगार देतात.म्हणजे जितके प्रोडक्ट्स डिलिव्हर केले जातील त्यानुसार पैसे दिले जातात. डिलिव्हरी बॉय होण्यासाठी काही प्रमाणपत्र ज्या कंपनीत नोकरी करायची तेथे जमा करावे लागतात. डिलिव्हरी बॉय होण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने अर्ज करता येतो.
आपण जेव्हा घरी आरामात बसून आपले ऑनलाईन प्रोडक्ट्स मागवत असतो तेव्हा डिलिव्हरी बॉय उन्हाचा,पावसाचा,थंडीचा विचार न करता आपल्यापर्यंत आपल्या प्रोडक्ट्सची डिलिव्हरी करीत असतो.कधीकधी त्यांची फार दया सुध्दा येते.ते किती कष्ट करतात आपल्याला घरपोच प्रोडक्ट्स मिळवून देण्यासाठी.सध्या करियर म्हणून या क्षेत्राकडे पाहिले जाते.खास करून फूड प्रोडक्ट्स डिलिव्हर करण्याच्या कामात अनेक संधी उपलब्ध आहेत.कितीतरी प्रोडक्ट्स आपण ऑनलाईन मागवू शकतो.काही लोक पूर्णवेळ किंवा पार्टटाईम जाॅब म्हणून या क्षेत्राकडे वळत आहेत.एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जाॅबकरीता कुठलीही परीक्षा घेतली जात नाही.फक्त व्यक्तीमत्व चाचणीवर तुम्हाला नोकरी मिळत असते.आपण बोलावलेली वस्तू आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहचावी असे आपल्याला नेहमीच वाटत असते.पण यामागे ती वस्तू आपल्यापर्यंत पोहचवायला
डिलिव्हरी बॉयला किती कष्ट पडतात याचा आपण कधी विचार करतो का? खास करून फूड डिलिव्हरीमध्ये कित्येकदा त्यांना यायला उशीर झाला की आपण त्यांच्यावर चिडचिड करून आपला संताप व्यक्त करीत असतो. डिलिव्हरी बॉय एक-एक डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करीत असतो.त्यामागे प्रचंड मेहनत लागते.पाठीवर कितीतरी किलोचं ओझं तो वाहत असतो.आपण फक्त तो लवकर आला नाही की त्याच्यावर रागावतो.कुठलंही काम छोटं नसतं.आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी काम करावंच लागतं.सध्या ऑनलाईन खरेदी नंतर प्रोडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बॉयला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले आहे.लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी करतात.त्यामुळे डिलिव्हरी बॉयला चांगले दिवस आलेत असे म्हणायला हरकत नाही.म्हणजेच डिलिव्हरी बॉय हा पर्याय दिलासा देणारा आहे.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleथकबाकीदार म्हणतो माजिप्राने कनेक्शन कापले: नागरिक मधील प्रावर धडकले, पहिले मोठे मासे पकडा मग आमच्याकडे या.
Next articleमोठ्ठी बातमी! भारतात फेसबुक आपोआप झाले बंद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here