Home अमरावती थकबाकीदार म्हणतो माजिप्राने कनेक्शन कापले: नागरिक मधील प्रावर धडकले, पहिले मोठे मासे...

थकबाकीदार म्हणतो माजिप्राने कनेक्शन कापले: नागरिक मधील प्रावर धडकले, पहिले मोठे मासे पकडा मग आमच्याकडे या.

125

आशाताई बच्छाव

IMG_20240305_201309.jpg

थकबाकीदार म्हणतो माजिप्राने कनेक्शन कापले: नागरिक मधील प्रावर धडकले, पहिले मोठे मासे पकडा मग आमच्याकडे या.
दैनिक युवा मराठा 
पुंडलिकराव ना देशमुख
अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी.
अमरावती.
थकबाकीदार अमरावती शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केल्यामुळे शहराच्या काही भागातील नागरिक आज, सोमवार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकले. त्यांनी कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांना निवेदन देत आपला रोष व्यक्त केला
शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू शेखावत, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मिलिंद शिंदे, माजी महापौर विलासभावु इंगोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी खासदार अनंत गुडे आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शासकीय व निमशासकीय कार्यालय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तुलनेत आम्ही अत्यंत छोटे थकबाकीदार आहोत. त्यामुळे पाण्याचे कनेक्शन कापून उन्हाळ्याच्या तोंडावर आम्हाला अडचणीत न आणता प्रथम आधी मोठ्या माशांना भ
धाक दाखवा. अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांचे मते त्यांना मजीप्राची थकबाकी बुडवायची नाही. परंतु आर्थिक बाजू काम करत असल्यामुळे संपूर्ण रक्कम यावेळी भरणे शक्य नाही. त्यामुळे एकूण थकबाकीचे सुलभ हप्ते पाडून घ्यावेत. अशी मागणी यावेळी करण्यात आली. चर्चा अंतिम कार्यकारी अभियंता नितीन उपरेलू यांनी याबाबत सकारात्मकता दर्शविली असे आंदोलन करण्याचे म्हणणे आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार माझी प्राचार २१४ कोटी रुपयांच्या थकबाकी मध्ये महानगरपालिका सर्वात मोठी थकबाकीदार असून सार्वजनिक पाणीपट्टी १३५ कोटी रुपये मनपाकडून द्यायचे आहेत. पोलीस वसाहतीमध्ये सुरू असलेल्या पाणीपुरवठ्याचे साडे ४ कोटी रुपये थकीत असून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे २ कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे ४२ लाख, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४० लाख, समाज कल्याण विभागाकडे ११ अकरा लाख, सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल कडे ९ लाख रुपये, पोलीस आयुक्त कार्यालयाकडे ८ लाख रुपये तर जिल्हा पोलीस अधीक्षक ५ पाच लाख रुपये वसुली करायची आहे अशी माहिती निवेदन देताना मिळाली आहे.

Previous articleअखिल भारतीय धृवतारा अपंग क्रांतिकारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांची आमरण उपोषणास भेट
Next articleडिलिव्हरी बॉय
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.