Home नांदेड मुखेड तहसील कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनचा भव्य मोर्चा धडकला…

मुखेड तहसील कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनचा भव्य मोर्चा धडकला…

170
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तहसील कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनचा भव्य मोर्चा धडकला…

मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तहसील कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनचा रोहयो घरकुल प्रश्नावर धडक मोर्चा दिल्ली येथील आंदोलन शेतकऱ्यांच्या मागण्या चा पाठिंबा बिलोली येथील दलित युवतीच्या बलात्कार आणि खुनाचा तीव्र निषेध महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा संघटनेच्यावतीने मौजे अंबुलगा बु मुखेड शहर आणि तालुक्यातील अनेक गावात मनरेगा अंतर्गत रोहयोची काम तात्काळ काढणे आणि इतर मागण्यासाठी तहसील कार्यालयावर शेकडो मजुराचा मोर्चा धडकला. मोर्चेकऱ्यांनी विविध रोहयो घरकुल संबंधी मागणीच्या घोषणांनी मुखेड शहर दुमदुमले दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करनयांच्या व पाठिंब्याच्या घोषणा देण्यात आल्या मंजुराचा
मोर्चा पोलिसाने तहसील गेटवर अडवला मंजूर आणि मुख्य रस्त्यावर थांबून आक्रमक घोषणा दिल्या बिलोली येथे दलित मूकबधिर युवतीचा बलात्कार व खून करण्यात आला त्यांचा निषेध नोंदविण्यात आला प्रशासनाने चर्चेसाठी बोलावले असताना युनियनच्या सहा सदस्याचे शिष्टमंडळ मा. तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली मा तहसीलदार यांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी फोनवर संवाद साधत असताना मागण्या शहरी रोजगार हमीची कामे सुरु करण्यासंबंधी आणि फुलेनगर वाल्मिक नगर नगर मधील घरी मालकीच्या हाक्कात लावणे याविषयी नगरपालिकेच्या आमसभेत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले ग्रामीण भागातील काम मागणी असलेल्या14गावात 28 जानेवारीपर्यंत रोहयोचे काम सुरू करण्याचे लेखी स्वरूपात सांगण्यात आली याच बरोबर अंबुलगा बु येथील रोहयोचे काम तातडीने सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यासाठी रोहयो कार्यक्रमाधिकारी यांनी प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले सदर मोर्चाचे नेतृत्व युनियनचे जिल्हाध्यक्ष विनोद गोविंदवार जिल्हा सचिव काॅ अंकुश अंबुलगेकर जिल्हा सहसचिव काॅ मंजुश्री कबाडे जिल्हाउपाध्यक्ष काॅ माधव देशटवाड रामराव यामावाड काॅ शिवाजी देवकते काॅ रेणुका तुटेवाड पार्वती माळी अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

Previous articleकोल्हापूर शहरात थुंकीमुक्त आभियान
Next articleहिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे निधन     
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here