Home कोल्हापूर हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे निधन     

हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे निधन     

154
0

राजेंद्र पाटील राऊत

हिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे निधन       कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल करणारे , शाहुपुरी तालमीचे मल्ल आणि भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार घेत होते. खंचनाळे यांच्या निधनाचे वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली. पैलवानांनी खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली.
खंचनाळे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील कोल्हापूरातील शाहुपुरी तालमीचे ते मल्ल होते. रंगाने उजळ, उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे एक उंचापुरा देखणा मल्ल अशीही जनमानसात त्यांची ख्याती होती. गेल्या महिना भरापासून श्रीपती खंचनाळे हे गंभीर आजारामुळे तीन वर्षांपासून अंथरुणाशी खिळून होते.
मात्र सध्या त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांच्यावर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक स्वरूपातील मदतीसाठी त्यांचा मुलगा रोहित खंचनाळे यांनी आवाहनही केले होते.पहिले हिंदकेसरी मल्ल असल्याने कुस्तीविश्वात त्यांना मान होता. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरी गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले. याच वर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या होत्या .

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleमुखेड तहसील कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनचा भव्य मोर्चा धडकला…
Next articleविजयदुर्ग  किल्ल्याची तटबंदी व बुरजाचे काम लवकरच सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here