Home महाराष्ट्र विजयदुर्ग  किल्ल्याची तटबंदी व बुरजाचे काम लवकरच सुरू

विजयदुर्ग  किल्ल्याची तटबंदी व बुरजाचे काम लवकरच सुरू

184
0

राजेंद्र पाटील राऊत

विजयदुर्ग  किल्ल्याची तटबंदी व बुरजाचे काम लवकरच सुरू

स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख शक्तिकेंद्र असलेला महत्वाचा जलदुर्ग काळाच्या ओघात विदीर्ण अवस्थेत पोहचला असल्याचे काही शिवभक्तांनी खा. संभाजीराजे यांच्या लक्षात आणून दिले त्यामुळे लवकरच विजयदुर्ग  किल्ल्याची तटबंदी व बुरजाचे काम सुरू करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती खा. संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेला मराठा आरमाराच्या प्रमुख शक्ती केंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी समुद्राच्या लाटांनी झिजली असून बुरुजचा भागही ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. छत्रपती संभाजीराजेंनी विजयदुर्ग गडाला ऑगस्ट महिन्यात भेट देऊन पाहणी केली होती.
गडाची पाहणी केल्यानंतर संभाजीराजे यांनी केंद्रीय सांस्कृतीक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना समक्ष भेटून गडाच्या सद्य:परिस्थिती लक्षात आणून दिली. तसेच लवकरच तटबंदीचे, व बुरुजाचे काम सूरु करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी केली होती.
यासंदर्भात नुकतेच मुंबई पुरातत्व कार्यालयाकडून संभाजीराजे यांना पत्र प्राप्त झाले असून लवकरच गडावर संवर्धनाचे काम सुरु करण्यात येणार आहे. तसेच या कामासाठी दिल्लीतील डी.जी.पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाकडून सुध्दा मान्यता मिळाली आहे.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleहिंदकेसरी पैलवान श्रीपती खंचनाळे यांचे निधन     
Next articleमहिलांवर अत्याचार करणाऱ्याला २१दिवसात शिक्षा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here