Home पुणे पुणे बालेवाडी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपची...

पुणे बालेवाडी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0053.jpg

पुणे बालेवाडी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी                                                    पुणे,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

पुणे बालेवाडी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपने आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी मारली आहे.बॅटल, (रन स्विम रन) , थ्रीटल, ( रन स्विम शूट)व लेझर रन( रन अँड शूट) अशा स्पर्धा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमधून पोर्तुगाल येथे वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी स्पर्धकांची निवड करण्यात आली. स्पर्धेमध्ये देशभरातून वेगवेगळ्या वयोगटातून सुमारे 700 ते 800 स्पर्धक सहभागी झाले होते सदर स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपचे 19 स्पर्धकानी मॉडर्न पॅथलोन असोसिएशन ऑफ रत्नागिरी यांच्यामार्फत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश ,पश्चिम बंगाल, ओडीसा ,झारखंड ,उत्तर प्रदेश ,उत्तराखंड,कर्नाटक, तेलंगणा आणि हरियाणा या राज्यातून 700 ते 800 स्पर्धक सहभागी झाले होते .सदर स्पर्धेमध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुपच्या खालील खेळाडूंनी यश प्राप्त केले .

1) करन महेश मिलके (वयोगट 19 ते 21) रन शूट रन (गोल्ड मेडल) प्रथम क्रमांक ,बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,थ्रीटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक

2 ) सागर तलवारला (वयोगट 21 ते 39) बॅटल ( सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,रन शूट रन (ब्रांच मॅडम) तृतीय क्रमांक

3) आर्यन प्रशांत घडशी ( वयोगट 19 वर्षाखालील) थ्रीटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,बॅटल (ब्राँझ मेडल )तृतीय क्रमांक

4 ) आयुष काळे( तेरा वर्षाखालील )रिटर्न (सुवर्णपदक)प्रथम क्रमांक, बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,रन सुट रन (ब्राँझ मेडल) तृतीय क्रमांक 5) निधी शरद भिडे (वयोगट 11 वर्षाखाली )थ्रीटल (सिल्वर मेडल )द्वितीय क्रमांक ,बॅटल (सिल्वर मेडल) द्वितीय क्रमांक ,रन शूट रन ( ब्राँझ मेडल)तृतीय क्रमांक 6) कार्तिकी प्रकाश भुरवणे- बेटल (ब्राँझ मेडल)तृतीय क्रमांक ,बॅटल (ब्राँझ मेडल) तृतीय क्रमांक

7) सोहम शशिकांत साळवी -रन शूट रन(ब्राँझ मेडल ) तृतीय क्रमांक या स्पर्धकांनी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पथकांची लयलूट केली आणि महाराष्ट्र राज्याकरता मिळवून दिले.22 ते 25 सप्टेंबर व 24 ते 30 ऑक्टोबर पोर्तुगाल येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता निवड झाली आहे .तसेच महाराष्ट्र कडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्ट टाइमिंग दिलेल्या तनया महेश मिलके, योगेंद्र गिरीधर तावडे ,निपुण सचिन लांजेकर या तीन खेळाडूंची विशेष खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

Previous articleआठ दिवसा पासून कावी हे गाव अंधारात, महावितरणचे मात्र दुर्लक्ष
Next articleधर्म हा भारतीय संस्कृती, समाजाचा कणा- डॉ. मधुसूदन पेन्ना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here