Home परभणी आठ दिवसा पासून कावी हे गाव अंधारात, महावितरणचे मात्र दुर्लक्ष

आठ दिवसा पासून कावी हे गाव अंधारात, महावितरणचे मात्र दुर्लक्ष

33
0

आशाताई बच्छाव

IMG-20220817-WA0057.jpg

आठ दिवसा पासून कावी हे गाव अंधारात, महावितरणचे मात्र दुर्लक्ष

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो 
चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

जिंतूर :-तालुक्यातील कावी गावातील लाईट साठि एकच रोहित्र ,पोल,व तार तुटून जाण्याच्या मार्गावर तर आहेच तरी देखील अजिर्ण लोंबकळत जाणार्या तारांचे घर्षणाने रोहित्र जळाल्यामुळे आठ दिवसापासून अंधारात आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.त्यातच पावसाचे दिवस सुरू असल्याने सगळीकडे घाण असल्याने डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यामुळे सगळीकडे आजाराचे प्रमाण वाढत आहे जिंतूर तालुक्यातील कावी हे अंधारात असल्यामुळे पाणी टंचाई तसेच पिठाच्या गिरण्या बंद असल्यामुळे नागरिकांना तारांबळ होत आहे. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावातील रोहित्र
लवकरात लवकर उपलब्ध करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here