Home जळगाव सावधान! तुम्हालाही अनोळखी महिलांचे व्हिडिओ कॉल येतात का? जळगाव व्यवसायिकाची फसवणूक सायबर...

सावधान! तुम्हालाही अनोळखी महिलांचे व्हिडिओ कॉल येतात का? जळगाव व्यवसायिकाची फसवणूक सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

269
0

आशाताई बच्छाव

IMG-20230622-WA0043.jpg

सावधान! तुम्हालाही अनोळखी महिलांचे व्हिडिओ कॉल येतात का? जळगाव व्यवसायिकाची फसवणूक सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

जळगाव, : लोकांना
अडकवण्यासाठी स्कॅमर सोशल मीडिया आणि
मेसेजिंग ॲप्सवर वेगवेगळ्या टिप्सचा वापर करत असून इंटरनेट युजर्सना व्हिडिओ कॉलच्या मदतीने ब्लॅकमेल करत आहे. व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून युजरला फसवून त्या बदल्यात पैशांची मागणी करण्याचे असे अनेक नवीन प्रकार समोर येत आहे. हा स्कॅम टाळण्यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. फेसबुकवर व्हिडिओद्वारे त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल ७ लाख ७७ हजार रुपये उकळल्याची घटना सायबर पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाली आहे.
शहरातील उच्चभ्रू वस्ती मध्ये मिनरल वॉटरचा व्यवसाय करणाऱ्या ५१ वर्षीय व्यावसायिकाने सायबर पोलीस स्टेशनला बुधवारी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. या व्यवसायिकाला १६ ते १९ जूनच्या दरम्यान त्यांच्या फेसबुक खात्यावर रिया अग्रवाल नामक खातेधारकाने फिर्यादी यांच्याशी मेसेंजर वर चॅटिंग व व्हिडिओ कॉल करून ओळख निर्माण केली. त्यानंतर फिर्यादीशी गोड गोड बोलून त्याचा नग्न व्हिडिओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. संशयित आरोपीच्या बँक व मोबाईल मधील गुगल पे खात्यामध्ये फिर्यादी यांनी वेळोवेळी ७ लाख ७७ हजार ७४५ रुपये पाठविले. दरम्यान फसवणूक झाल्याचे
लक्षात येताच फिर्यादी व्यवसायिकांनी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्या वरून अज्ञात रिया अग्रवाल नामक अकाउंट धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here