Home नाशिक बाबासाहेब डमाळे पाटील मित्र परिवाराच्या वतीने– लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली...

बाबासाहेब डमाळे पाटील मित्र परिवाराच्या वतीने– लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात शनिवार २४ रोजी होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान–

267
0

आशाताई बच्छाव

IMG-20230622-WA0045.jpg

बाबासाहेब डमाळे पाटील मित्र परिवाराच्या वतीने–

लासलगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात शनिवार २४ रोजी होणार विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान–

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवरायांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यथोचित सन्मान व्हावा त्यांना शाबासकीची थाप मिळावी व या शाबासकीतूनच त्यांना अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर हिंदू साम्राज्य दिन लासलगाव येथे शनिवार २४ जून रोजी सकाळी १० वाजता बालाजी नगर येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात येवला येथील सामाजिक कार्यकर्ते तथा बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळाचे वतीने येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये राबविला जाणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक तथा ब्राह्मण महासंघ विश्वस्त सौ स्मिताताई कुलकर्णी व सामाजिक कार्यकर्ते निलेश अरुण जगताप लासलगाव यांनी दिली आहे.
या दैदिप्यमान सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ समाजसेवक, धर्म रक्षक ,साधू संत, महंत, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था त्याचबरोबर ज्येष्ठांचा समावेश केला जाणारा असून त्या सर्वांना शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवराज्याभिषेकाचा पराक्रम ही पुस्तिका देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समाजसेवक, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, समस्त ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी, तरुण मित्र मंडळ आदींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असेही आव्हान कार्यक्रमाचे आयोजक व बाबासाहेब डमाळे पाटील मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी, येवला- लासलगाव विधानसभा मतदारसंघ आदींनी केले आहे.
—————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here