• Home
  • 🛑 चालण्याचा व्यायाम कसा करावा? जाणून घ्या ६ आठवड्यांचा फायदेशीर प्लान 🛑

🛑 चालण्याचा व्यायाम कसा करावा? जाणून घ्या ६ आठवड्यांचा फायदेशीर प्लान 🛑

🛑 चालण्याचा व्यायाम कसा करावा? जाणून घ्या ६ आठवड्यांचा फायदेशीर प्लान 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

✍️ आरोग्य टिप्स :-

मुंबई, 22 जुलै : ⭕ सुदृढ राहण्यासाठी शरीराची हालचाल होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच व्यायाम करण्यावर भर दिला जातो. इतर व्यायाम प्रकारांसोबतच चालणं हा देखील एक उत्तम व्यायाम मानला जातो. चालण्यामुळे अतिरिक्त चरबी घटते, ऊर्जा वाढते, शिवाय तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठीही मदत होते. चालणं हा व्यायाम मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतो, असं तज्ज्ञ सांगतात. पण, अनेकांना प्रश्न पडतो की, आम्ही घरातल्या घरात खूप चालतो. याशिवाय चालण्याचा व्यायाम कसा करावा? यासाठी नियोजन महत्त्वाचं आहे. चालणं सुरू करण्याआधी प्लॅन तयार केला तर आणखी सोयीस्कर ठरेल.

⭕चालण्यासाठी खालीलप्रमाणे सहा आठवड्यांचा आराखडा तयार करा.⭕

➡️ पहिला आठवडा :-

▶️ पहिल्या आठवड्यातील पहिला आणि दुसरा दिवस १० ते २० मिनिटंच चाला. चालण्याचा वेग तुमच्या क्षमतेनुसार कमी-जास्त करण्याची मुभा आहे. २० मिनिटं सलग चालणं शक्य नसेल तर वरील क्रियेची दोन सत्रात विभागणी करा.

▶️ तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचं प्लॅनिंग आधीच्या दोन दिवसांना विचारात घेऊन करा. म्हणजे आधीच्या दिवशी चालण्यात काही अडचण आली नसेल तर चालण्याचा कालावधी २० मिनिटांहून ३० मिनिटं करा.

▶️ पाचव्या दिवशी तुम्हाला जमेल तितका वेळ चालण्यास प्राधान्य द्या.

▶️ दररोजप्रमाणे सहाव्या दिवशी देखील चालायला जा.

▶️ आठवड्याच्या शेवटी म्हणजेच सातव्या दिवशी तुमच्या क्षमतेनुसार चालण्याचा कालावधी ठरवा.

➡️ दुसरा आठवडा :-

▶️ पहिल्या आठवड्याप्रमाणे दुसऱ्या आठवड्यातही दररोज किमान १० मिनिटं चालायला हवं.

▶️ तज्ज्ञांच्या मते, दिवसातून दोनदा चालल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दुसऱ्या आठवड्यात चालण्याचा कालावधी ४० मिनिटं ते एक तास केला तरी चालेल.

▶️ दुसऱ्या आठवड्यात प्रत्येक दिवशी ४० मिनिटं चाला; जेणेकरून त्याची सवय होईल.

➡️ तिसरा ते सहाव्या आठवड्यासाठी :-

▶️ सलग दोन आठवडे नित्यनेमाने चालल्यामुळे त्याची शरीराला सवय झाली असेल. लक्षात ठेवा चालण्याची सुरुवात १० ते १५ मिनिटांपासून करायला हवी. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही कालावधीत पाच ते दहा मिनिटं वाढवू शकता.

▶️ दोन सत्रात विभागणी करून सलग एक तास चाला.

➡️ टिप्स

▶️ कधी चालावं?

तज्ज्ञांच्या मते, चालणं प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असतं. त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा. दररोज चाला आणि फिट रहा. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी ५ ते ७ यावेळेत चालण्याचा व्यायाम करा.

▶️ कुठे चालावं?

चालण्यासाठी कोणती जागा योग्य असते, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. चालण्याला कोणत्याही जागेचं बंधन नसतं. सद्यस्थितीत गच्चीत किंवा बाल्कनीत फिरणं योग्य ठरेल.

▶️ योग्य पद्धत कोणती?

चालताना हात सरळ रेषेत न ठेवता कोपरातून ९०° कोन तयार करा. खांदे सैल असू द्या आणि हाताची बोटं किंचित आतील बाजूस असावी.

▶️ फायदे काय?

दररोज किमान २० मिनिटं चालल्यानं पायांच्या स्नायूंना बळकटी येते. शिवाय, ते लवचीक होतात.⭕

anews Banner

Leave A Comment