• Home
  • 🛑 कोथरूड मधे विनामूल्य आत्याधुनिक कोविड-१९ रुग्ण सेवा केंद्र …! 🛑

🛑 कोथरूड मधे विनामूल्य आत्याधुनिक कोविड-१९ रुग्ण सेवा केंद्र …! 🛑

🛑 कोथरूड मधे विनामूल्य आत्याधुनिक कोविड-१९ रुग्ण सेवा केंद्र …! 🛑
✍️कोथरूड 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे:⭕ कोरोनाची लागण झालेल्या मात्र कोणताही त्रास होत नसलेल्या रुग्णांसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा पुण्यातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोविड रुग्णसेवा केंद्र सुरू केले आहे. सुमारे १०४ रुग्णांची राहण्याची क्षमता असलेले हे केंद्र हिंजवडीतील एका हॉटेलमध्ये सुरू करण्यात आले असून सर्व सोयींनी युक्त आहे.

अशा प्रकारची केंद्रे प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात सुरू करावीत, असे आवाहन पाटील यांनी केले आहे. या कोविड सेंटरसाठी डॉक्टर आणि इतर स्टाफसाठी पुणे महानगरपालिकेचे सहकार्य घेण्यात आले आहे. रोजचा संपूर्ण खर्च आमदार पाटील यांच्यामार्फत करण्यात येत आहे. सध्या या सेंटरमध्ये ३९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झालेले किरकोळ लक्षणे असलेले व अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांची सोय येथे करण्यात आली आहे.

शहरातील वाढत्या पेशंटची संख्या लक्षात घेत केवळ ज्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे, अशा रुग्णांनाच उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले तर शहरातील सर्वच रुग्णालयातील खाटांचा उपयोग ज्यांना गरज आहे, अशा रुग्णांसाठी होईल. त्यामुळे आमदार पाटील यांनी सुरु केलेला उपक्रम इतर लोकप्रतिनिधींनी आंमलात आणण्याची गरज आहे.
या संदर्भात पाटील म्हणाले, ‘‘आगामी काळात कोरोनाची लागण झालेल्या मात्र, सौम्य लक्षणे असलेल्या किंवा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे राहणार आहे. अशावेळी या प्रकारच्या रुग्णांसाठी प्रत्येक मतदारसंघात कोविड सेंटर उभारल्यास मोठ्या रुग्णालयांतील मोकळ्या खाटांचा उपयोग ज्यांना त्रास अधिक होतो. ज्यांना उपचारांची गरज आहे, अशा रुग्णांसाठी करता येईल.

नजिकच्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढेल, हे लक्षात घेतले तर केवळ महापालिकेची किंवा राज्य सरकारची यंत्रणा याकामी पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे आमदार, नगरसेवकांसह स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्था तसेच स्थानिक गणेश मंडळांनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

‘‘बजाजसारख्या उद्योग समूहातील अनेक कंपन्या यासाठी सीएसआर करण्यास तयार आहेत. त्यामुळे कोरोनाचे नजिकच्या काळातील आव्हान लक्षात घेऊन केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता लोकप्रतिनिधी तसेच सवयंसेवी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.

या भूमिकेतून कोथरूड मतदारसंघातील नागरिकांसाठी या कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे,’’

असे पाटील यांनी सांगितले…⭕

anews Banner

Leave A Comment