**राममंदिर भूमीपूजनाला २२ किलोची चांदीची वीट**✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)
श्री राम प्रभूंच्या मंदिराचं भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे. या दिवशी २२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून पाया रचला जाणार आहे. या वीटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही लिहिण्यात आलं आहे. तसंच जय श्रीराम असंही लिहिण्यात आलं आहे. एवढंच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे.
एवढंच नाही तर भूमिपूजन करण्यासाठी देशातल्या पवित्र नद्यांचं पाणीही आणलं जाणार आहे. तसंच पवित्र मातीही आणली जाणार आहे. त्यासंबंधीची तयारी सुरु करण्यात आली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे
