• Home
  • **समीक्षा मोरे ही १० वी च्या निकालात दहीवड गावातून प्रथम*

**समीक्षा मोरे ही १० वी च्या निकालात दहीवड गावातून प्रथम*

**समीक्षा मोरे ही १० वी च्या निकालात दहीवड गावातून प्रथम*✍️(🔸राहुल मोरे दहीवड निवासी संपादक युवा मराठा न्यूज🔸)

कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्यात आज दि.२९ राज्याचा माध्यमिक बोर्डाचा निकाल दुपारी एक वाजेला ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला,मागील वर्षापेक्षा ह्या वर्षी गुणात्मक संपादणूक अधिक आहे.
दहावी भूगोलाचा पेपर न झाल्यामुळे या विषयांचं गुणदान हे बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भूगोलच्या पेपरच्या गुणांमध्ये करण्यात आलं.
एखाद्या शैक्षणिक संस्थेने ज्ञानदानासाठी सुरुवात कारावी आणि संस्थेची भर भराट व्हावी असच एक उदाहरण म्हणजे दहिवड येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय होय.सण ११९९ मध्ये सुरुवात होऊन आज पर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी या विद्यालयाने घडवले आहेत ,त्याच प्रमाणे याही वर्षी (२०२०) मध्ये १००% निकाल लावत यशाचे शिखर गाठले.
या वर्षीच्या विद्यालयाच्या माध्यमिक निकाल मध्ये माजी बहीण कु.समीक्षा कैलास मोरे हिने ९२.२०% गुण मिळवलं गावातून तसाच विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला,या यशामागे विद्यालयाच्या मुख्यद्यापक व इतर शिक्षक यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले.
या यशामुळे समीक्षाचे सर्वच स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.

anews Banner

Leave A Comment