Home नांदेड जांब येथे अवैध गुटखा पोलीस छाप्यात जप्त 15 लाखांचा माल जप्त..2 आरोपींना...

जांब येथे अवैध गुटखा पोलीस छाप्यात जप्त 15 लाखांचा माल जप्त..2 आरोपींना अटक

126
0

राजेंद्र पाटील राऊत

जांब येथे अवैध गुटखा पोलीस छाप्यात जप्त
15 लाखांचा माल जप्त..2 आरोपींना अटक

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जांब (बु.) येथे पोलीसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून अवैध गुटखा बाळगून विक्री करणारे दोन आरोपीविरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे. यावेळी सुमारे 15 लाख रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही घटना मंगळवार दि. 21 रोजी झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की मुखेड तालुक्यातील जाब बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा विक्री केली जात होती याबाबत अनेकांनी लेखी तक्रारी केल्या होत्या यानंतर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून सुमारे पंधरा लाख रुपयाचा अवैद्य गुटका जप्त केला आहे यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्या मंडळी मध्ये एकच खळबळ उडाली आहे.आरोपी नामे नागेश नारायण दूरनाळे रा. जांब बुद्रुक याचे घरून 3,26,700/- रु. गोवा,सितार व राजनिवास नावाचा गुटखा एकूण 63 पोते जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध मुखेडला विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नामे रामराव नागनाथ शिंदे रा. जाम बुद्रुक यांचे घरून 11,85,800/- रु चा नजर व आरजे नावाचा गुटखा एकूण 210 पोते जप्त करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध मुखेडला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना अटक केली आहे.सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सचिन सांगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन आनसपुरे, पोलिस जमादार आत्माराम कामजळगे, पोलीस आमदार ज्ञानेश्वर ठाकूर, सिद्धार्थ वाघमारे, मारुती मेकलेवाड, दोसलवार, शिवाजी आडबे, बालाजी दंतापल्ले, योगेश कोकणे यांच्या पथकाने केली आहे.
जांब बु येथे अवैध धंदे बोकाळले
लातूर जिलहाच्या सीमावर्ती भागांत वसलेले जांब बु हे मुखेड कंधार, उदगीर जी लातूर अहमदपूर जी लातूर या चार तालुक्याच्या निकट असलेले केंद्र स्थानी गाव आहे या ठिकाणी अवैध वाहतूक अवैध गुठका जुगार मटका अवैध दारू चे प्रमाण वाढले आहे. दरम्यान जांब बु हे छोटे से गाव 5 हजार लोकवस्ती चे असुन या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला गुटका नेमका कुठून आला याबाबत चर्चा रंगत असून हा मागे एखादे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे जांब बु हे अवैध व्यवसाचाचे केंद्र बिंदू झाले असुन
जांब बु कडे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here